Tuesday, August 4, 2026
spot_img
HomeSanghtanaमराठा सेवा संघ स्थापनेचा, वर्धापन दिन महोत्सव संपन्न

मराठा सेवा संघ स्थापनेचा, वर्धापन दिन महोत्सव संपन्न

मराठा सेवा संघ स्थापनेचा, वर्धापन दिन महोत्सव संपन्न

श्रेयश वानखेडे:

मराठा सेवा संघ, तालुका बल्लारपूरचे वतीने दिनांक १ सप्टेंबरला, मराठा सेवा संघाचे स्थापनेच्या ३४ व्या वर्धापन दिनानिमित्त स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व यशवंतांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा. शिवश्री  मनोहर माडेकर जिल्हा कार्याध्यक्ष मराठा सेवा संघ चंद्रपूर, तर उद्घाटक म्हणून मा. ओंकार ठाकरे तहसीलदार बल्लारपूर यांची उपस्थिती लाभली. प्रमुख मार्गदर्शक चेवनिंग स्कॉलर व सामाजिक कार्यकर्ता एडवोकेट दीपक चटप व प्रमुख पाहुणे मा.डॉ. अनिल शिंदे, सचिव, सर्व सेवा शिक्षण प्रसारक मंडळ यांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवश्री सुरेश पंदीलवार तालुका अध्यक्ष मराठा सेवा संघ बल्लारपूर, यांनी मराठा सेवा संघ स्थापने मागचा उद्देश व मराठा सेवा संघाची 34 वर्षातील परिवर्तनशील सामाजिक कार्यातील यशस्वी वाटचाल यावर प्रकाश टाकला. मा. ओंकार ठाकरे यांनी आपले उद्घाटन पर भाषणातून विद्यार्थ्यांसाठी मोलाचे मार्गदर्शन केले व मोबाईल रील्स सारख्या गोष्टींमध्ये विद्यार्थ्यांनी आपला वेळ दवडू नये, अशी सूचना केली. एडवोकेट दीपक चटप यांनी आपल्या ओघवत्या व प्रभावी भाषण शैलीतून विद्यार्थ्यांना प्रगतीपथाकडे जाण्यासाठी शिष्यवृत्ती मिळविण्याची संधी कशी उपलब्ध आहे व ती मिळवण्यासाठी कोणत्या मार्गाने कष्ट व मेहनत करून ती साकार करता येते. याबद्दल माहिती देऊन विद्यार्थ्यांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मा. अनिल शिंदे यांनी सुद्धा याप्रसंगी मार्गदर्शन केले.

    मा. मनोहर माडेकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून बहुजन विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षा अभ्यासाकडे वाढणारा कल व यात अभ्यासिका व वाचनालय सहाय्यक ठरत असल्या बाबत माहिती देऊन, सध्या स्थितीतील स्पर्धा परीक्षा मधील घोटाळे, पेपर फुटी वारंवार तारखा बदलणे, परीक्षा घेऊनही निकाल जाहीर न करणे, तसेच नोकरी नियुक्ती याबाबत चालढकल करणे इत्यादी बाबत, शासनाच्या चुकीच्या व शंकास्पद धोरणाबद्दल चिंता व्यक्त केली.

     या कार्यक्रमांमध्ये सन 2024 मध्ये विविध शासकीय विभागात नोकरीसाठी नियुक्ती मिळालेल्या, 15 विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकासह सत्कार करण्यात आला.  यामध्ये पोलीस उपनिरीक्षक पदी अजय कोरडे, वनरक्षक पदासाठी सुप्रिया खाडे व वैष्णवी राऊत, कनिष्ठ अभियंता जिल्हा परिषद पदासाठी दीक्षा कुळमेथे व आदर्श कुळमेथे, पोलीस शिपाई पदासाठी मोनिका शेरकी, गायत्री राऊत, रोहित आत्राम, अर्शिया पठाण, शिल्पा आडे, पायल टोंगे, एस आर पी एफ विभागात चेतन खाडे, खुशाल बोभाटे तर कॅनॉल निरीक्षक पदासाठी अंजू भोंगळे व सहाय्यक भांडारपाल पदासाठी ममता मिलमिले यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

     कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी अनिल वागदरकर, राजेंद्र खाडे ,सुनील बुटले, प्रा. लिंगे, रोहित चुटे, साहिल घिवे,  योगिता शेडमाके, शोभा माडेकर, मंदाताई वाटेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रम संचालन नितीन वरारकर तर आभार प्रदर्शन चंद्रकांत पावडे यांनी केले.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page