बल्लारपूर येथील अत्याचार पीडित आत्महत्या प्रकरणी लॉजचा मालक आणि व्यवस्थापकाला अटक
श्रेयश वानखेडे:-
शहरातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि पीडितेने आत्महत्या केल्याप्रकरणी लॉजचा मालक आणि व्यवस्थापक ला अटक करण्यात आली आहे. एका अल्पवयीन मुलीला लॉजमध्ये प्रवेश दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी शिवम दिनेश दुपारे वय २२ वर्ष रा. मौलाना आझाद वार्ड याला मंगळवारी तक्रार दाखल केल्यानंतर काही तासांतच अटक करण्यात आली. पीडितेचे आरोपी शिवम दुपारे सोबत प्रेमसंबंध होते. २ सप्टेंबर ला दोघेही लॉजवर गेले. उशिरा घरी परतल्यानंतर कुटुंबीयांनी तिची विचारपूस केली असता पीडितेने बलात्काराची झाल्याचे कथा रचली होती. त्यावर कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली. पण पोलीस स्टेशन मध्ये संपूर्ण सत्य बाहेर आले. या घटनेच्या विविध चर्चा आणि बरीच बदनामी मुळे पीडितेने काल ४ सप्टेंबर रोजी दुपारी राहत्या घरी गळफास लावून घेतला.
मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी तिचा प्रियकर शिवमला अटक करून तीन दिवसाची पोलीस कोठडी घेतली. लॉजचे संचालक राकेश दीनानाथ पांडे (५२) आणि चौकीदार बंडू बळीराम कामतकर (६४) यांनाही नियमांचे उल्लंघन करून अल्पवयीन मुलीला लॉजमध्ये प्रवेश दिल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध भारतीय न्यायिक संहिता ६४ (१), ४९ कलम व पोक्सो १७, २१(१) अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले. असून त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले.
पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गोविंद चाटे करीत आहे.
या विषयी पोलीस निरीक्षक सुनील गाडे म्हणाले की, लोकांमध्ये विविध प्रकारच्या अफवा पसरल्या आहेत. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एकच आरोपी असून त्याला घटनेच्या दिवशीच अटक करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलीला लॉजमध्ये प्रवेश दिल्याप्रकरणी संचालक आणि व्यवस्थापकावरही कारवाई करण्यात आली आहे. या घटनेनंतर शहरात काही खोट्या अफवा पसरवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अशा अफवांमुळे वातावरण बिघडते आणि कायदा व सुव्यवस्था बिघडते. कोणीही कोणत्याही प्रकारची अफवा पसरवू नये, जनतेनेही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अफवा पसरवणाऱ्यांची पोलीस ठाण्यात तक्रार करावी.