Thursday, April 23, 2026
HomeParbhaniजिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाबाबत घेतला आढावा.
spot_img

जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाबाबत घेतला आढावा.

जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाबाबत घेतला आढावा.

बी. रघुनाथ सभागृहात बैठक संपन्न : ऑनलाईन अडचणींचा घेतला आढावा.

श्रेयश वानखेडे: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद परभणी, महानगरपालिका परभणी आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा स्तरीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाबाबत शुक्रवार 18 जुलै रोजी येथील बी. रघुनाथ सभागृहात आढावा बैठक पार पडली.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती गीता साखरे होत्या. यावेळी महानगरपालिका क्रीडा अधिकारी राजकुमार जाधव, शारीरिक शिक्षण संघटनेचे अध्यक्ष रणजित काकडे, जिल्हा क्रीडा संकुल समितीचे नवनियुक्त सदस्य गणेश माळवे, राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे आदी मान्यवर उपस्थित होते. बैठकीत जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन, नियोजन आणि ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेतील अडचणी यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच तालुकास्तरीय स्पर्धांमध्ये येणार्‍या अडचणींवर तालुका संयोजकांनी आपली मते मांडली. क्रीडा साहित्याची उपलब्धता आणि खेळाडूंना सुविधा मिळाव्यात यावरही चर्चा झाली.2025-26 या शैक्षणिक वर्षातील विभागीय व राज्यस्त रीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजना विषयी जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती साखरे यांनी मार्गदर्शन केले. ऑनलाईन पोर्टलवर येणार्‍या तांत्रिक अडचणींवर सविस्तर उत्तर देत त्यांनी प्रत्येक शाळेने या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहनही केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा अधिकारी सुयश नाटकर यांनी केले. सूत्रसंचालन किशोर ढोके, तर आभारप्रदर्शन रोहन औढेकर यांनी केले. ही बैठक यशस्वी करण्यासाठी तालुका क्रीडा संयोजक तुकाराम शेळके (पाथरी), प्रशांत नाईक (सेलू), किशन भिसे (मानवत), दिलीप चव्हाण (जिंतूर), धर्मसिंग बायस (पूर्णा), शिवाजी तळेकर (सोनपेठ), विलास राठोड (गंगाखेड), मोतीराम शिंदे (पालम) यांच्यासह प्रकाश पंडित, धीरज नाईकवाडे, योगेश आदमे आदींनी परिश्रम घेतले.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page