जयश्री सोनकवडे यांना बडतर्फ करा व कार्यकर्त्यावरील गुन्हे रद्द करा : बसपाची मागणी
श्रेयश वानखेडे:
संभाजीनगर (औरंगाबाद) येथील सामाजिक न्याय विभागाच्या उपायुक्त जयश्री सोनकवडे यांच्याकडे असलेल्या मागासवर्गीयांच्या कामात दिरंगाई, पक्षपात, घोटाळा आदि संदर्भात चर्चा करून निवेदन देण्यासाठी दिनांक 6 सप्टेंबर रोजी बसपा चे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ गेले होते. सोनकवडे ह्या बसपा कार्यकर्त्यांशी उरमटपणाने वागल्या एवढेच नव्हे तर त्यांनी आपला घोटाळा लपविण्यासाठी उपस्थित असलेल्या बसपा च्या सर्व कार्यकर्त्यांची तक्रार करून त्यांच्यावरच गुन्हे दाखल केले.
सोनकवडे ह्या भ्रष्ट महिलेमुळे महाराष्ट्रातील बसपाच्या कार्यकर्त्यात रोष निर्माण झाला. त्यामुळे राज्यातील बसपा कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्याकडे या घटनेची तक्रार करून संभाजी नगरातील (औरंगाबाद) सामाजिक न्याय विभागाच्या उपायुक्त जयश्री सोनकवडे यांना नोकरीतून बडतर्फ करणे व बसपा कार्यकर्त्यांवर दाखल केलेले खोटे गुन्हे रद्द करणे या संदर्भात निवेदनाद्वारे मागणी केली आहे. हिच्यावर लाचखोरीच्या केसेस सुद्धा सुरू आहे ते विशेष.
बसपा चे प्रदेशाध्यक्ष एड सुनील डोंगरे यांच्या सहीचे निवेदन निवासी उप जिल्हाधिकारी अनुप खंडे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्याला देण्यात आले. निवेदन देताना प्रदेश महासचिव डॉ मोहन राईकवार, प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, नागपूर जिल्हाध्यक्ष योगेश लांजेवार, जिल्हा कोषाध्यक्ष उमेश मेश्राम, माजी जिल्हाध्यक्ष विलास सोमकुवर, मनोज माहोरे, अंकुश पाटील आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.