Tuesday, January 20, 2026
HomeCrimeशिक्षण विभाग माध्यमिक जिल्हा परिषद चंद्रपूर येथील कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
spot_img

शिक्षण विभाग माध्यमिक जिल्हा परिषद चंद्रपूर येथील कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

शिक्षण विभाग माध्यमिक जिल्हा परिषद चंद्रपूर येथील कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

श्रेयश वानखेडे:

शिक्षण विभाग (माध्यमिक ) जिल्हा परिषद चंद्रपूर येथील 1) श्री. सावन चालखुरे विस्तार अधिकारी (शिक्षण), 2) श्री. लघुत्तम किसन राठोड विस्तार अधिकारी (शिक्षण) जिल्हा परिषद चंद्रपूर, वय 56 वर्षे, 3) श्री. महेश्वर कारूजी फुलझेले वय 73 वर्षे सेवानिवृत्त जेष्ठ सहाय्यक, जिल्हा परिषद (प्राथमिक) चंद्रपूर यांचे विरुद्ध 50,000/- लाच मागणी संबंधाने  लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर यांच्या पथकाने दिनांक: 27/09/2024 रोजी कारवाई केली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, यातील तक्रारदार हे चंद्रपूर येथील रहिवासी असून त्यांचे कम्प्युटर  इन्स्टिट्यूट असून कम्पुटर इन्स्टिट्यूट मध्ये नवीन मराठी, इंग्रजी आणि हिंदी जीसीसी आणि टीबीसी कम्प्युटर टायपिंग हा कोर्स सुरू करायचा असल्याने शासनाकडून मान्यता मिळण्याकरीता महत्त्वाचे कागदपत्रासह जिल्हा परिषद चंद्रपूर येथील शिक्षण विभाग येथे अर्ज केला होता. त्यानंतर तक्रारदार हे शिक्षण विभाग( माध्यमिक), जिल्हा परिषद चंद्रपूर येथे आलोसे क्रमांक 1) सावन चालखुरे विस्तार अधिकारी व आलोसे क्रमांक 2) लघुत्तम राठोड विस्तार अधिकारी यांना भेटले असता, त्यांनी प्रस्ताव शासनास सादर करण्याचे कामाकरीता शिक्षणाधिकारी मॅडम पैसे मागत असून तुम्ही ते दिल्याशिवाय तुमचे काम होणार नाही असे सांगून तक्रारदारास 70,000/- लाच रकमेची मागणी केली होती.

परंतु तक्रारदार यांना आलोसे क्रमांक 1) सावन चालखुरे विस्तार अधिकारी व आलोसे क्रमांक 2) लघुत्तम राठोड विस्तार अधिकारी यांना लाच रक्कम देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी लाचलूचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर येथे येऊन दिनांक: 31/07/ 2024 रोजी तक्रार नोंदवली. प्राप्त तक्रारीवरून वेळोवेळी करण्यात आलेल्या पडताळणी कारवाई दरम्यान आलोसे क्रमांक 1 आणि आलोसे क्रमांक 2 यांनी तक्रारदार यांना त्यांचा प्रस्ताव शासनास मंजुरी करता पाठवण्याकरता 70,000/- लाच रकमेची मागणी करून तडजोडीअंती 50000/- लाच स्वीकारण्याचे मान्य केले व आलोसे क्रमांक 3 महेश्वर फुलझेले यांनी लाच रक्कम देण्यास अपप्रेरणा दिली. त्यावरून दिनांक: 27/09/ 2024 रोजी वरील तिन्ही आलोसे यांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास कार्य सुरू आहे.

सदरची कार्यवाही श्री. दिगंबर प्रधान पोलीस अधिक्षक ला. प्र. वि. नागपूर, श्री. संजय पुरंदरे अप्पर पोलीस अधीक्षक ला. प्र. वि. नागपूर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक श्रीमती मंजुषा भोसले, पोलीस निरीक्षक जितेंद्र गुरनुले, सफौ रमेश दुपारे, पोहवा अरुण हटवार, पोहवा नरेशकुमार नन्नावरे, रोशन चांदेकर, हिवराज नेवारे, पोशि वैभव गाडगे, अमोल सिडाम, प्रदीप ताडाम, राकेश जांभुळकर, मपोशि मेघा मोहुर्ले, पुष्पा काचोळे, चापोशि सतीश सिडाम, सर्व लाचलूचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर तसेच चापोशी रवी तायडे, मोपवि चंद्रपूर यांनी यशस्वी पार पाडली आहे. हॅश व्हॅल्यू घेण्यात आलेली आहे.

सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम ( एजंट )यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य  लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमच्या ची संपर्क साधावा.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page