मुख्याध्यापकांचा/ प्राचार्यांचा सहलीच्या अनामत रकमेवर डल्ला
कोणत्याही शाळा महाविद्यालयाची सहल जाते तेव्हा ज्या मार्गाने सहल नेल्या जाते तेथे नियमानुसार जास्तीचे अनामत रक्कम म्हणून भरून घेते. या सर्व बाबींवर मुख्याध्यापकांचे/प्राचार्यांचे नियंत्रण, नजर असते.
सहल नेण्यासाठी शासनाच्या नियमानुसार एसटी बस किंवा रेल्वे बुक करावी लागते. किती रक्कम भरावी लागते हे संबंधित विभाग सांगतात. मान. शिक्षण अधिकारी यांच्या परवानगीनुसार सहल नेल्या जाते. सहल जाऊन आल्यानंतर संबंधित विभाग हिशोब करून बाकी रक्कम वापस करण्यासाठी मुख्याध्यापक/ प्राचार्य यांना आवतन देतात.
खरे तर जी रक्कम वापस मिळते, ती मुख्याध्यापक/ प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांना वापस करून द्यायला पाहिजे. परंतु नजरेत खोट आणि रकमेवर डोळा असल्यामुळे साहेबांचं मन काही लागत नाही. आणि त्यातल्या त्यात प्रॉब्लेम असला तर पुन्हा गडबड घोटाळा हा नक्की ठरला असतो.
अशातच मुख्याध्यापक/ प्राचार्य स्वतःच संबंधित विभागाशी संपर्क करून आपला मोबाईल नंबर देऊन वापस आलेली अनामत रक्कम रफादफा करण्याच्या घटना उघडकीस आल्याची चर्चा सुरू आहे.
मुख्याध्यापक/ प्राचार्य मात्र नाकाला जीभ पुरवून मी तो नव्हे हीच भूमिका घेत असल्याची सुद्धा चर्चा सुरू आहे.
सहल नेण्याच्या आधी जास्तीची रक्कम विद्यार्थ्यांकडून काढली जाते, ते मात्र वेगळेच!