Monday, January 19, 2026
HomeJayantiजनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे दुसरे...
spot_img

जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

श्रेयश वानखेडे:

जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री  जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष बी. बी. भगत मुख्याध्यापक तर प्रमुख पाहुणे एम. डी. टोंगे माजी मुख्याध्यापक होते.
प्रमुख उपस्थिती आर. के. वानखेडे व यु. के. रांगणकर यांची होती.
प्रथमता: मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या फोटोला मार्ल्यापण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
 आर. के. वानखेडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनपटावर माहिती सांगितली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष बी. बी. भगत मुख्याध्यापक यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी देशाला दिलेल्या योगदानाबद्दल माहिती विशद केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक यु. के. रांगणकर, संचालन एस. एन. लोधे  मॅडम व आभार प्रदर्शन एस.  एम. चव्हाण यांनी केले. शेवटी विद्यार्थ्यांना चॉकलेटचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page