Friday, July 10, 2026
HomeEducationनवीन संगणक टायपिंग मान्यता देण्यात येऊ नये.
spot_img

नवीन संगणक टायपिंग मान्यता देण्यात येऊ नये.

नवीन संगणक टायपिंग मान्यता देण्यात येऊ नये.

श्रेयश वानखेडे:

नवीन संगणक टायपिंग मान्यता देण्यात येऊ नये अशा प्रकारचे निवेदन चंद्रपूर जिल्हा शासनमान्य काम्पुटर टंकलेखन व लघुलेखन संस्थांची संघटना यांनी दिनांक: 24/09/2024 रोजी मान. शिक्षणाधिकारी( माध्यमिक) जिल्हा परिषद चंद्रपूर यांना दिले.
त्यात संघटनेने नमूद केले की, मान. शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या कार्यालयात नवीन संगणक मान्यतेचे बरेच प्रस्ताव प्राप्त झाल्याचे कळले व भविष्यातही  अनेक प्रस्ताव येतील,  मात्र नवीन संगणक टायपिंग मान्यता देतांना बऱ्याच वर्षापासून सुरू असलेल्या जुन्या संस्थाचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात यावा.
अनेक संस्था चालकांची विद्यार्थी अभावी आर्थिक परिस्थिती फार गंभीर असल्याचे चित्र समोर येत आहे. त्यातही जर नवीन संस्थाना मान्यता जर का नजीकच्या संस्थेलगत देण्यात आल्या, तर जुन्या संस्थाविरोधात नवी संस्था अशी स्पर्धा सुद्धा निर्माण होईल व  जे जुने संस्था चालक आहे. ज्यांनी आपलं आयुष्य या व्यवसायकरिता वाहून घेतलं. त्यांना त्यांचा उदरनिर्वाह करणे देखील कठीण होऊन जाईल. करिता नवीन संगणक टायपिंग मान्यता देतांना प्रामुख्याने दोन संस्थेमधील अंतर व जुन्या प्रस्तावित संस्थांची विद्यार्थी संख्या देखील विचारात घेण्यात यावी.
संघटनेने पुढे सांगितले की, उपरोक्त विषयाला अनुसरून आपणास पुन्हा विनंती करण्यात येत आहे की, नवीन संगणक टायपिंग मान्यता देतांना चंद्रपूर जिल्हा काम्प्युटर टायपिंग व लघुलेखन संघटनेला तसेच नजीकच्या जुन्या प्रस्थापित संस्थांना विश्वासात घेऊन नवीन मान्यता देण्यात यावी.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page