Wednesday, February 11, 2026
HomeChandrapurमारोडा येथे भव्य नेत्र चिकित्सा शिबीर
spot_img

मारोडा येथे भव्य नेत्र चिकित्सा शिबीर

मारोडा येथे भव्य नेत्र चिकित्सा शिबीर

मुल तालुक्याच्या सर्वांगीण विकासासह सर्वसामान्यांच्या सेवेचा संकल्प- ना.सुधीर मुनगंटीवार


Shreyash Wankhede: जनतेचे आरोग्य उत्तम राहावे, दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिलो आहे. लोकांच्या आरोग्यासाठी सहकार्याचा हात पुढे करत दिव्यांग बांधवांना स्वयंचलित सायकलीचे वाटप, बालकांच्या हृदयाची शस्त्रक्रिया,50 हजारपेक्षा जास्त लोकांचे नेत्र चिकित्सा शिबिर, 35 हजारपेक्षा जास्त लोकांना चष्मेवाटप तर पाच हजारपेक्षा जास्त लोकांच्या मोतीबिंदूचे ऑपरेशन करण्याचे सौभाग्य प्राप्त झाले आहे. या क्षेत्राचा लोकप्रतिनिधी म्हणून मुल तालुक्याच्या सर्वांगीण विकासासह सर्वसामान्यांची सेवा करण्याचा संकल्प केला असल्याची ग्वाही राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

मारोडा येथे माता कन्यका सेवा संस्था, चंद्रपूर यांच्या माध्यमातून व मा. ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून भव्य नेत्र चिकित्सा शिबीराचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी, सरपंच (मारोडा) भिकाजी शेंडे,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरनुले, चंदु मारगोनवार, प्रेमदास गेडाम, जयश्री वेलकेवार, नंदु रणदिवे, प्रियंका नरमलवार तसेच नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.

मतदारसंघाचा विकास साधतांना येथील नागरीकांना अपेक्षित असलेली विकासकामे मार्गी लावली आहेत. असे सांगून पालकमंत्री  ना. मुनगंटीवार म्हणाले,  मुल ते मारोडा रस्ता, कृषी महाविद्यालय, सिमेंट काँक्रिट रोड, मारोडा रेल्वे थांबा आदि विविध कामे पुर्णत्वास आली असून या ठिकाणचे प्राथमिक आरोग्य केंद्र उत्तम व्हावे यासाठी प्रयत्नशील असल्याचे ना. मुनगंटीवार म्हणाले.  मारोडा गाव विकसीत व्हावे यासाठी येथे कृषी महाविद्यालयाची उभारणी करण्यात येत आहे. प्रत्येक गावाच्या विकास कामांसाठी कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला. मारोडा येथील तलावाचे सौंदर्यीकरण, वाचनालय, महादेव मंदिराचा जीर्णोद्धार आदी विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार असून मारोडा प्रवेशद्वार उभारण्याची येथील गावकऱ्यांची मागणी होती, हि मागणी लक्षात घेवून प्रवेशद्वार (गेट) उभारणीसाठी वनविभागाच्या ताडोबा फाऊंडेशनच्या माध्यमातून 25 लक्ष रुपयाचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे ना. मुनगंटीवार म्हणाले.

ना. मुनगंटीवार पुढे म्हणाले, नेत्रचिकित्सा शिबिराच्या माध्यमातून जेष्ठांची सेवा करण्याची संधी प्राप्त झाली. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र (पी.एच.सी) उत्तम करण्यात आल्या असून राज्याचे मुख्यमंत्री यांना विनंती करुन मतदार संघातील पाच उपकेंद्रांना विशेष बाब म्हणून मान्यता मिळवून दिली. तसेच मुल येथील ग्रामीण रुग्णालय अत्याधुनिक करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. भोई समाजासाठी मच्छीमार कल्याणकारी  महामंडळाच्या स्थापनेस मंत्रीमंडळाने नुकतीच मान्यता दिली. शबरी आवास, रमाई आवास, प्रधानमंत्री आवास व इतर आवास योजनेसाठी देण्यात येणारे अनुदान 1.30 लाखावरुन रु. 2.50 लाख केले. निराधार योजनेच्या अनुदानात 600 रुपयावरुन 1500 रुपये वाढ दिली. रस्ते हि ग्रामीण विकासाची रक्तवाहिनी आहे. ग्रामीण भागातील पाणंद रस्ते तसेच शहरातील मुख्य रस्ते उत्तम केले. मा. राज्यपाल महोदयांनी पोंभुर्णा क्षेत्रातील रस्त्यांच्या कामांचे कौतूक केले असल्याचे ना.मुनगंटीवार यांनी आवर्जुन सांगितले. सर्व जाती, धर्माच्या विकासासाठी कार्य केले असून 50 वर्षात न झालेली विकासकामे येत्या 10 वर्षात पुर्णत्वास नेली असून मारोडा वासियांनी विकासाची गंगा थांबू देवू नये असेही पालकमंत्री ना.मुनगंटीवार म्हणाले.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page