Sunday, December 7, 2025
HomeBirthdayजनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा...
spot_img

जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस व हात धुवा दिवस साजरा

जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस व हात धुवा दिवस साजरा

श्रेयश वानखेडे:
जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस व हात धुवा दिवस साजरा करण्यात आला.
घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला बी. बी. भगत मुख्याध्यापक हे अध्यक्षस्थानी, तर एम. डी. टोंगे माजी मुख्याध्यापक हे प्रमुख पाहुणे, तर यु. के. रांगणकर व आर. के. वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रथमता: मंचावर उपस्थित मान्यवरांनी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या फोटोला मार्ल्यापण करून कार्यक्रमाची सुरुवात केली.
        याप्रसंगी शाळेचा विद्यार्थी अथर्व नितेश हिकरे याला ” इंडियन आयकान सुपर चाइल्ड अवार्ड ” मिळाल्याबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्याचे अभिनंदन करण्यात आले. वाचन प्रेरणा दिवस या निमित्ताने कु. अवनी पेटकर हिने वाचन करून दाखवले.
शाळेचे शिक्षक आर. के. वानखेडे यांनी भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
शाळेचे शिक्षक  एस. एम. चव्हाण  यांनी हात धुण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले.
कार्यक्रमाचे संचालन एस. एम. लोधे व आभार प्रदर्शन आर. बी. अलाम यांनी केले. कार्यक्रमात शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी,  विद्यार्थी उपस्थित होते.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page