बल्लारपूर पोलीसांनी अतिशय कठोर परिश्रम करून विसापुर येथील गाय चोरणाऱ्या टोळीतील ४ आरोपींना गजाआड केले असून त्यांचा पासून दोन लाख ३६ हजार रुपयांचे मुद्देमाल जप्त केले.
पोलीस ठाणे बल्लारपुर हद्दीतील विसापुर येथील मनोहर बापुजी गिरडकर वय ४५ वर्षे, रा. विसापुर ता. बल्लारपुर जि. चंद्रपुर यांचा मालकीची एक पांढऱ्या रंगाची गाय वय अंदाजे ०६ वर्षे कि.अं.१५,०००/-रु. ची चोरीस गेल्याबाबत पोलीस ठाणे येथे ३१ ऑक्टोबर रोजी तक्रार दिल्याने गुन्हा रजि.क्रं.१००३/२०२४ कलम-३०३ (२) भारतीय न्याय संहिता-२०२४ अन्वये नोंद केले. सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक हुसेन शहा व डि.बी. स्टॉफ यांनी अज्ञात आरोपीचा तांत्रीक पध्दतीने तपास करुन एजाज बेग असलम कुरेशी वय ३६ वर्षे रा. नुरी चौक, बगड खिडकी वार्ड चंद्रपुर, वसीम कुरेशी नबी कुरेशी वय-३६ वर्षे रा. नुरी चौक, बगड खिडकी वार्ड, चंद्रपुर, मोहम्मद फैज अब्दुल रशीद वय-२२ वर्षे रा. कसाबपुरा मरकस मस्जिद जवळ, चांदुरबाजार जिल्हा अमरावती, अब्दुल इसरार कुरेशी अब्दुल जलील कुरेशी वय-२६ वर्षे रा. जिलानी नगर दादमहल वार्ड, चंद्रपुर यांना शुक्रवार दिं ०१/११/२०२४ रोजी अटक करण्यात आले. त्यांच्या कडून गुन्हयात वापरण्यात आलेल्या एक जुनी वापरती पांढऱ्या रंगाची टाटा व्हिस्टा चारचाकी वाहन क्रं. एमएच ४९ बी ५३६३ किं १,२०,०००/- रुपये, जुनी वापरती सिल्व्हर रंगाची टाटा इंडिका चारचाकी वाहन क्रं. एमएच ३४ के ५८९४ किं १,००,०००/- रुपये व इतर मुद्देमाल व नगदी रोख रक्कम कि.१६,०००/-रु. असा एकुण-२,३६,०००/-रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आली. सदर आरोपींची अधिक तपास केला असता त्यांनी यापुर्वी वेगवेगळया ठिकाणी गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.