Friday, July 31, 2026
spot_img
HomePoliticalवणीच्या भाजप कार्यकर्त्याचे अभद्र वक्तव्यः बल्लारपूर कुणबी समाजा तर्फे निषेध

वणीच्या भाजप कार्यकर्त्याचे अभद्र वक्तव्यः बल्लारपूर कुणबी समाजा तर्फे निषेध

वणीच्या भाजप कार्यकर्त्याचे अभद्र वक्तव्यः बल्लारपूर कुणबी समाजा तर्फे निषेध 

Shreyash Wankhede:
वणीच्या भाजप कार्यकर्त्याने अभद्र वक्तव्य केल्याने बल्लारपूर कुणबी समाजा तर्फे निषेध व्यक्त केले असून त्याच्या वर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.
         दिनांक ४ नोव्हेंबर रोजी वणी येथील भाजपा चे उमेदवार यांचा कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी एका कार्यकर्त्याने “साले कुणबी ५०० रुपयात विकले जातात व ईलेक्ट्रीक खांबांवर मुतणार्या कुत्रासारखी अवस्था कुणब्याची झालेली आहे.” असे आपत्तीजनक वक्तव्य भाजपाचे विद्यमान आमदाराचे उपस्थित केल्यामुळे समस्त कुणबी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. आमदारांनी यावर कोणतेही भाष्य केले नाही ही बाब खेदजनक आहे. त्यामुळे सर्व शाखीय कुणबी समाज बल्लारपूर तर्फे  उपविभागीय अधिकारी बल्लारपूर व ठाणेदार पोलीस स्टेशन बल्लारपूर यांना निवेदन देण्यात आले व संबंधितांवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. व जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.
       याप्रसंगी पी.यु. जरीले, प्रा. एम.यु.बोंडे, मनोहर माडेकर, विवेक खुटेमाटे, अनिल वाग्दरकर, प्रमोद आवते, सुधीर कोरडे, प्रा.एल.के.बलकी,  प्रा.राजेंद्र खाडे, उत्तम तेलंग, रवी वाकुलकर,  प्रशांत धाडवे,  शंकर काळे, गजानन घुगुल, संदिप कोरडे, खुशाल कोरडे, राजेश खेडेकर, संजय मांडवकर उपस्थित होते.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page