Sunday, December 7, 2025
HomeElectionसत्ता परिवर्तनाच्या लढाईत प्रत्येकाने आपला सहभाग नोंदवावा - सचिन पायलट यांचे आवाहन.
spot_img

सत्ता परिवर्तनाच्या लढाईत प्रत्येकाने आपला सहभाग नोंदवावा – सचिन पायलट यांचे आवाहन.

सत्ता परिवर्तनाच्या लढाईत प्रत्येकाने आपला सहभाग नोंदवावा – सचिन पायलट यांचे आवाहन.

श्रेयश वानखेडे:
महायुती सरकारच्या काळात भ्रष्टाचार फोफावला असून महाराष्ट्रात पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार आणून महाराष्ट्राला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन सचिन पायलट यांनी केले.
 भद्रावती येथील स्वागत सेलिब्रेशन येथे आयोजित सभे दरम्यान महाराष्ट्र हे देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारे राज्य असून या ठिकाणी धर्मनिरपेक्ष सरकार म्हणून महाविकास आघाडीतील प्रत्येक उमेदवाराला निवडूण आणणे ही आपली जबाबदारी आहे.
 विकासातील सातत्य व भविष्यातील विधानसभा क्षेत्राच्या विकासाकरीता महाविकास आघाडीने आपल्या समोर योग्य उमेदवारी दिल्याचेही यावेळी सांगितले. महायुती सरकारच्या काळात महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार वाढले असून भ्रष्टाचार वाढला आहे.
 राज्यातील अनेक उद्योग दुसऱ्या राज्यात जात आहे. राज्यातील विकासाचे ध्येय ठेवून कार्य करणाऱ्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान करुन सत्ता परिवर्तनाच्या लढाईत आपला सहभाग नोंदवावा, असे मत देखील यावेळी सचिन पायलट यांनी केले. यावेळी मंचावर खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार अभिजित वंजारी, यांसह महाविकास आघाडीच्या अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page