Sunday, July 12, 2026
HomeFraudचंद्रपूर जिल्ह्यात कनिष्ठ महाविद्यालयावर 18-20 बोगस भरती
spot_img

चंद्रपूर जिल्ह्यात कनिष्ठ महाविद्यालयावर 18-20 बोगस भरती

चंद्रपूर जिल्ह्यात कनिष्ठ महाविद्यालयावर 18-20 बोगस भरती

मान. उल्हास नरड, शिक्षण उपसंचालक यांचा पाय पुन्हा खोलात

एसआयटी गठीत करण्यात यावी.- नागो गाणार

श्रेयश वानखेडे:
मान. शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांचा पाय पुन्हा खोलात जाण्याची शक्यता वाढलेली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांना जे 2016- 2017 पासून  कामच करीत नव्हते, त्यांना काम करताना दाखवले आहे.
त्यांची बोगस मान्यता सन 2022 मध्ये करून, त्यांना सन 2022 मध्ये बोगस शालार्थ आयडी सुद्धा वाटप करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. यामध्ये लोकप्रतिनिधी समाविष्ट असल्याशिवाय एवढे मोठे काम करण्याची हिंमत मान. उल्हास नरड करू शकत नाही.
नागपूर येथील शिक्षण विभागातील प्रचंड भ्रष्टाचार व बोगस शालार्थ आयडी प्रकरणात नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक मान. उल्हास नरड यांना दिनांक:11/04/2025 रोजी रात्री गडचिरोली येथून अटक करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने याबाबत वारंवार शासन दरबारी तक्रारी करून कारवाईची मागणी केली होती.
माजी शिक्षक आमदार नागो गाणार यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की,  बोगस नियुक्त्या व बोगस शालार्थ आयडी प्रकरणी एसआयटी गठीत करण्यात यावी. नागपूर जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण नागपुर विभागात बोगस शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या व बोगस शालार्थ आयडी चे कारनामे झालेले आहे आणि यामध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात मागील वर्षी मार्च महिन्यात बोगस नियुक्ती व बोगस शाळा आयडी वापरून पगार काढण्यात आला होता.
त्यामध्ये अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक आणि शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद चंद्रपूरचा प्रभार एकाच व्यक्तीकडे होता. त्यामध्ये सुद्धा मान. उल्हास नरड उपसंचालक नागपूर विभाग यांचा हात आहे हे स्पष्टपणे सिद्ध होत आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page