Wednesday, August 5, 2026
spot_img
HomeElection15 नोव्हेंबर रोजी स्वीप अंतर्गत मॅराथॉन रॅलीचे आयोजन

15 नोव्हेंबर रोजी स्वीप अंतर्गत मॅराथॉन रॅलीचे आयोजन

15 नोव्हेंबर रोजी स्वीप अंतर्गत मॅराथॉन रॅलीचे आयोजन

चंद्रपूर( जीमाका) : मतदान जनजागृतीसाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत असून शुक्रवार दि. 15 नोव्हेंबर रोजी सकाळी 6.15 वाजता मॅराथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
‘माझे मत माझा अधिकार’, ‘होय मी मतदान करणारच’, ‘आपण सगळे मतदान करू या – लोकशाहीला बळकट करू या’ अशा विविध घोषवाक्यांसह 18 व 18 वर्षावरील सर्व स्त्री – पुरुष यात मोठ्या संख्येने सहभागी होणार असून रॅलीद्वारे मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचा प्रशासनाचा मानस आहे.  मॅराथॉन रॅलीचे उ‌द्घाटन आझाद बगीचा येथे करण्यात येणार आहे. त्यानंतर सदर रॅली गिरनार चौक ते पठाणपूरा गेट ते गांधी चौक ते जटपुरा गेट रोड ते परत आझाद बगीचा येथे रॅलीचा समारोप होईल. रॅलीत सहभागी विद्यार्थी/ नागरिकांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था सुद्धा केली जाणार आहे.
सदर रॅलीत मोठ्या संख्येने विद्यार्थी, नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी संजय पवार यांनी केले आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page