Sunday, December 7, 2025
HomeJayantiसंभाजी ब्रिगेड बल्लारपूर तर्फे भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी
spot_img

संभाजी ब्रिगेड बल्लारपूर तर्फे भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी

संभाजी ब्रिगेड बल्लारपूर तर्फे भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी

श्रेयश वानखेडे:
दिनांक १५ नोव्हेंबर २०२४ रोजी, बल्लारपूरच्या झाशी राणी चौक, विवेकानंद वार्ड येथे संभाजी ब्रिगेडने भगवान बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली.
या कार्यक्रमात संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते रोहित चुटे यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. त्यांच्या देशासाठी केलेल्या अतुलनीय योगदानाचे स्मरण करून त्यांनी उपस्थितांना प्रेरित केले. यावेळी, दीप आत्राम यांनीही आपले मनोगत व्यक्त करीत भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांचे महत्त्व विशद केले.
या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संभाजी ब्रिगेड बल्लारपूर शहर अध्यक्ष साहिल घिवे, गणेश मसराम, प्रज्वल गौरकार, वैशाली कुळसंगे, मोहित अदमाने, शिवा कोतपल्लिवार, दीप आत्राम आणि संभाजी ब्रिगेडचे अन्य पदाधिकारी व सदस्य यांनी परिश्रम घेतले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page