जनता कनिष्ठ महाविद्यालय गोंडपिपरी येथे संविधान दिन साजरा
श्रेयश वानखेडे:
दिनांक 26 नोव्हेंबर 2024 रोज मंगळवार ला जनता कनिष्ठ महाविद्यालय गोंडपिंपरी येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष पर्यवेक्षक काळे सर, प्रा. बांदुरकर सर, पाळी प्रमुख , प्रमुख वक्ते राजू झाडे, सामाजिक कार्यकर्ता, प्रशांत कोसनकर, सामाजिक कार्यकर्ता, प्रा. नागापुरे सर, प्रा. बोबडे सर, प्रा. नारनवरे सर, सांस्कृतिक प्रमुख हे मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस दीप प्रज्वलन आणि मालार्पण करून झाली. यानंतर संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करून शपथ घेण्यात आली. कार्यक्रमाला प्रमुख वक्ते राजू झाडे यांनी विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाची विस्तृत अशी माहिती दिली व संविधानाचा जागर प्रत्येकाने केला पाहिजे तरच आपला भविष्यकाळ हा प्रभावी असेल, असे उद्गार काढले. यानंतर प्रा. बांदूरकर सर यांनी संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या .
प्रस्तुत कार्यक्रमाच्या अनुषंगाने कनिष्ठ महाविद्यालयात निबंध स्पर्धा, भाषण स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक तेजल हमंद, द्वितीय प्रज्ञा कुकुडकर, तृतीय नंदिनी कोहपरे व प्रोत्साहन पर रत्नदीप सातपुते या विद्यार्थ्याना पारितोषिक आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.तितरमारे सर तर आभार प्रा. बेझलवार मॅडम यांनी मानले. कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका तथा शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
कार्यक्रमाला सर्वांनी सहकार्य केले.