Thursday, June 4, 2026
HomePoliceवाळू ची तस्करी करणाऱ्या 4 ट्रकसह 52.60 लाख रुपयांचा माल जप्त :...
spot_img

वाळू ची तस्करी करणाऱ्या 4 ट्रकसह 52.60 लाख रुपयांचा माल जप्त : ट्रक चालक, क्लिनर, ट्रक मालकासह 11 जणांवर गुन्हा दाखल

वाळू ची तस्करी करणाऱ्या 4 ट्रकसह 52.60 लाख रुपयांचा माल जप्त :  ट्रक चालक, क्लिनर, ट्रक मालकासह 11 जणांवर गुन्हा दाखल

श्रेयश वानखेडे:

रात्रीच्या अंधारात वाळू तस्करी होत असल्याच्या माहितीच्या आधारे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकाने नागभीड तालुक्यात वाळूने भरलेल्या 4 ट्रकसह 52.60 लाख रुपयांचा माल जप्त केला. ट्रक चालक, क्लीनर व मालक यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना नागभीड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.  ही कारवाई 11 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 ते 9 या वेळेत कानपा ते शंकरपुर मार्गावर करण्यात आली, त्याची तक्रार आज 14 डिसेंबर रोजी सकाळी नोंदवण्यात आला आहे.  या कारवाईमुळे गडचिरोलीतून लगतच्या जिल्ह्यात सुरू असलेल्या वाळू तस्करीचा पर्दाफाश झाला आहे.

        गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणारी वैनगंगा नदीच्या तीरावर अनेक रेती घाट आहेत. मात्र यावर्षी रेती घाटांचा लिलाव झालेला नाही. असे असतानाही नदी घाटातून वाळूचे अवैध उत्खनन व वाहतूक होत आहे.  याबाबत माहिती मिळताच नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या आदेशानुसार सावनेर पोलिसांनी अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध मोहीम हाती घेतली. दरम्यान, 11 डिसेंबर रोजी सायंकाळी सावनेरच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगला मोकासे यांनी त्यांच्या पथकासह सायंकाळी 7 वाजता कानपा ते शंकरपूर मार्गावर नागभीड येथील मोडीवर गडचिरोली जिल्ह्यातील वडसा घाट येथून 10 चाकी ट्रक क्र.  एमएच 40 सीएम 9382 थांबवून त्याची झडती घेतली.  झडती घेतल्यानंतर पोलिसांनी 10 लाख रुपये किमतीचा ट्रक व 45 हजार रुपये किमतीची वाळू जप्त केली, सायंकाळी ट्रक क्र. एमएच 32 एएस 1786 हा वाळू भरून 15.85 लाख रुपयांच्या मालासह जप्त केले.वैरागड घाटातून वाळू भरून येणारा ट्रक क्र.एमएच 32 क्यू 5932 सह15.85 लाख जप्त केले. व रात्री 9 वाजता वडसा घाटातून वाळूने भरलेला ट्रक क्र. एमएच 36 एए 3751 या क्रमांकाची झडती घेतली असता त्यात भरलेला वाळू व ट्रक असा एकूण 10.45 लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

     चारही कारवाईत पोलिसांनी धामणगाव ता. भिवापूर जि. नागपूर ट्रकचालक ईशाद सुमेध रामटेके वय 20 वर्ष रा.धामणगाव ता. भिवापूर जि. नागपूर, ट्रक मालक जावेद खान वय 30 वर्ष रा. हुडकेश्वर जि. नागपूर, ट्रकचालक लक्ष्मण उर्फ ​​गोलू अमृत निषाद वय 28 वर्ष रा. दहेगाव जि वर्धा, क्लिनर गजानन सीताराम आडे वय 26 वर्ष रा.दहेगाव जि वर्धा, ट्रक मालक इर्शाद खान  रा. सेलू जि वर्धा, ट्रकचालक सुधीर रामचंद्र तेलतुमडे वय 35 वर्ष रा. मास्टर कॉलनी सावंगी मेघे जि.वर्धा, क्लिनर नितीन नारायणराव नेवारे वय 35 वर्ष रा नरमुला जि वर्धा, ट्रक मालक जुबेर खान झाकीर हुसेन कॉलनी वर्धा ट्रकचालक जितेश गंगाधर ढोणे वय 30 वर्ष रा. कावरपेठ त. उमरेड जि नागपूर, क्लिनर सूरज संजय मुळकर वय 19 वर्ष रा कावरपेठ त. उमरेड जि नागपूर आणि ट्रक मालक जावेद शेख रा. उमरेड जि नागपूर याच्याविरुद्ध पर्यावरण संरक्षण कायदा कलम 15, मोटार वाहन कायदा 113, 194(1), खाण व खनिज कायदा कलम 4, महाराष्ट्र जमीन महसूल कलम 48(7),48(8),3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर यांचा आदेशानुसार नागपूर जिल्ह्यातील सावनेर, कळमेश्वर व इतर पोलिस ठाण्याच्या पोलिस पथकाने ही कारवाई केली आहे.  या प्रकरणी नागभीड पोलीस ठाण्याचे अधिकारी रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली नागभीड पोलीस तपास करत आहेत.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page