Saturday, August 8, 2026
spot_img
HomeJayantiजनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे साने गुरुजी जयंती साजरी

जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे साने गुरुजी जयंती साजरी

जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे साने गुरुजी जयंती साजरी

श्रेयश वानखेडे:
जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे साने गुरुजी जयंती  दिनांक: 24/ 12/ 2024 रोजी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बी. बी. भगत मुख्याध्यापक, प्रमुख पाहुणे म्हणून एम. डी. टोंगे माजी मुख्याध्यापक, यु. के रांगणकर सर यांची मंचावर उपस्थिती होती.
प्रथमता: मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते साने गुरुजी यांच्या फोटोला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शाळेच्या विद्यार्थिनी  रूपाली निमकर, त्रिशाली महानंद, आनंदी गवई यांनी ” तु बुद्धी दे ” गीत गायन केले तसेच ” खरा तो एकची धर्म ” हे गीत  रूपाली निमकर व  वैशाली महानंद यांनी गायन केले.
रांगणकर सर यांनी सांगितले की, साने गुरुजी यांच्यावर गांधीजींच्या विचाराचा पगडा पडला होता. शांततेच्या मार्गाने समाजाच्या प्रती जागृती करण्याची त्यांच्यात क्षमता होती. यानंतर एम. डी. टोंगे सर माजी मुख्याध्यापक साने गुरुजी यांनी मानवतेचा संदेश दिला आणि स्वातंत्र्यलढ्यात त्यांचे  महत्त्वपूर्ण योगदान होते. अध्यक्षीय भाषण  बी. बी. भगत मुख्याध्यापक यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर. के. वानखेडे, संचालन एस. एन. लोधे मॅडम तर आभार प्रदर्शन एस. एम. चव्हाण सर यांनी केले. कार्यक्रमात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी गणेश चंदावर बाबू, जगदीश कांबळे,  वामनभाऊ बोबडे,  वाल्मीक खोंडे,  इंद्रभान अडबाले तथा विद्यार्थी गण उपस्थित होते. कार्यक्रमाचे शेवटी विद्यार्थ्यांना चॉकलेटचे वाटप करण्यात आले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page