Sunday, April 19, 2026
Homeबल्लारपूरसारस क्रेन पक्ष्यांच्या अधिवासासाठी वन विभाग सरसावला
spot_img

सारस क्रेन पक्ष्यांच्या अधिवासासाठी वन विभाग सरसावला

सारस क्रेन पक्ष्यांच्या अधिवासासाठी वन विभाग सरसावला

पक्षी संवर्धनासाठी इटोली व मानोरा येथे नियोजन

श्रेयश वानखेडे:

तालुक्यातील मानोरा व इटोली गावालगत सारस क्रेन पक्ष्यांचे एकेकाळी मोठ्या प्रमाणात वास्तव्य होते. मात्र हे पक्षी नामशेष होण्याच्या मार्गांवर आहे. याची चिंता वन्यजीव व पक्षी आणि मित्रांना सतावत होती. निसर्गातील महत्वाच्या घटकांचे संवर्धनासाठी बल्लारपूर वन विभाग सरसावला आहे. सारस क्रेन पक्ष्यांच्या संवर्धनासाठी मानोरा व इटोली परिसरात जनजागृती करण्यात येत आहे. यामध्ये वन विभागाचे अधिकारी व वन्यजीव तथा पक्षी प्रेमी संघटना देखील सहभागी होत असल्याची माहिती बल्लारपूर वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे यांनी दिली.

     एकेकाळी सारस पक्ष्यांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य बल्लारपूर तालुक्यातील मानोरा व इटोली परिसरात होते. आजघडीला हे पक्षी या भागातून नामशेष झाले आहे.

या अनुषंगाने बल्लारपूर वन विभागाने सारस पक्ष्यांच्या संवर्धनासाठी पुढाकार घेतला आहे. त्याच्या संवर्धनासाठी व अधिवास निर्माण करण्यासाठी जनजागृती सुरू केली आहे. मानोरा येथील वन परिक्षेत्र मध्ये बांध तलाव परिसरात जनजागृती कार्यक्रम घेतला. यावेळी मध्य चांदा वन विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक आदेशकुमार शेंडगे, इको -प्रो चे अध्यक्ष बंडू धोत्रे, बल्लारपूर चे वन परिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे, हवामान विभागाचे अधिकारी नंदकुमार लोमटे, चंद्रपूर चे गट विकास अधिकारी विजय पेंदाम, बल्लारपूर तालुका कृषी अधिकारी श्रीधर चव्हाण, मुकेश भांदककर, पक्षी मित्र संजय शेगावकर, मानोरा येथील सरपंच जीवनकला ढोंगे, इटोली चे सरपंच तुळशीदास पिपरे आदींच्या माध्यमातून सारस पक्ष्यांच्या संवर्धनासाठी बल्लारपूर वन विभाग सरसावला आहे.

       सारस पक्षी निसर्गातील महत्वाचा घटक आहे. एका प्रकारे ते शेतकऱ्यांचे मित्र आहे. मात्र,शेतातील उत्पन्न वाढीसाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खते वापरली जात आहे. परिणामी दिवसेदिवस पक्ष्यांचे अधिवास कमी झाले आहे. सर्वात उंच उडणारा व साडे पाच फूट उंचीचा सारस क्रेन पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आल्याची चिंता पक्षी प्रेमींनी व्यक्त केली. ते जोडीने अथवा लहान गटाने तलावा शेजारी आणि भात शेतीच्या जवळ त्यांचा अधिवास असतो. नाकतोडे, टोळ किटक हे त्याचे खाद्य आहे.

*मानोरा व इटोली लगत अधिवास क्षेत्र निर्माण करणार*

सारस क्रेन पक्षी भारत,दक्षिण-पूर्व आशिया खंड आणि आस्ट्रेलिया मध्ये आढळून येतात. याची सर्वाधिक संख्या भारत मध्ये आहे. मात्र,शेतकरी शेतातील उत्पन्न वाढीसाठी रासायनिक खते व किटकनाशक मोठ्या प्रमाणात वापरत आहे. यामुळे सारस, या निसर्गातील महत्वाचा घटक नामशेष होण्याच्या मार्गांवर आहे. यावर उपाययोजना करा,म्हणून पक्षी संघटना न्यायालयात गेली. न्यायालयाने वन विभागाला याची विचारणा केली. परिणामी वन विभाग खळबळून जागे झाले. बल्लारपूर तालुक्यातील मानोरा व इटोली परिसरात सारस पक्षी संवर्धनासाठी अधिवास निर्माण करण्याचा प्रयत्न करू लागला आहे. शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती प्रकल्प राबविण्यासाठी सूचना केली आहे. यासाठी जनजागृती करण्यात येत असल्याचे माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे यांनी दिले.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page