Saturday, December 6, 2025
HomeJayantiमहात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात इतिहास व सांस्कृतिक विभागातर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती...
spot_img

महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात इतिहास व सांस्कृतिक विभागातर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात इतिहास व सांस्कृतिक विभागातर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

श्रेयश वानखेडे:
बल्लारपूर शहरातील स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय येथे इतिहास व सांस्कृतिक विभागाच्या वतीने 193 वी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करून वंदन करण्यात आले यावेळी विचार मंचावर प्रमुख अतिथी म्हणून प्रभारी प्राचार्य डॉ. रजत मंडल सर, डॉ. किशोर चौरे, डॉ. बालमुकुंद कायरकर, डॉ. पल्लवी जुनघरे, प्रा. शुभांगी भेंडे(शर्मा), प्रा. मोहनीश माकोडे यांची उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करतांना डॉ. किशोर चौरे यांनी ” स्त्री शिक्षणात सावित्रीबाई फुले यांची भूमिका महत्वाची असून खऱ्या अर्थाने महात्मा फुल्यांच्या खांद्याचा खांदा लावून समाज प्रबोधनाचे कार्य केले. विशेष म्हणजे सावित्रीबाईनी त्या काळात मुलींसाठी एकूण १८ शाळा काढल्या.” त्यानंतर प्रभारी प्राचार्य डॉ. रजत मंडल यांनी मार्गदर्शन केले व सावित्रीबाई फुले जयंतीच्या सर्वांना सुभेच्छा दिल्या, कार्यक्रमाचे संचालन डॉ. किशोर चौरे तर आभार प्रदर्शन वरिष्ठ लिपिक प्रकाश मेश्राम यांनी केले. यावेळी डॉ. बादलशाह चव्हाण, डॉ. बालमुकुंद कायरकर, डॉ. किशोर चौरे, डॉ. पल्लवी जुनघरे, प्रा. शुभांगी भेंडे, प्रा. सतिश कर्नासे, प्रा. स्वप्नील बोबडे,  प्रा. पंकज नंदुरकर, प्रा. दिपक भगत, प्रा. मोहनीश माकोडे, प्रा. श्रद्धा कवाडे यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

 

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page