श्रेयश वानखेडे:
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गुरुदेव सेवा मंडळ बल्लारपूर तर्फे आयोजित शोभा यात्रा व महाराजांच्या पालखीचे महाराणा प्रताप वॉर्ड,प्रभाग ०६ बल्लारपूर च्या सौ. जयश्री किशोर मोहुर्ले(माजी नगरसेविका,बल्लारपूर)व श्री किशोर नानाजी मोहुर्ले (सामाजिक कार्यकर्ता, बल्लारपूर) यांच्या तर्फे स्वागत करण्यात आले. शोभा यात्रेत उपस्थितांना चहा पाण्याची व्येवस्था करण्यात आली. या प्रसंगी बल्लारपूर भाजपा महिला आघाडी अध्यक्षा सौ. वैशालीताई जोशी उपस्थित होत्या. सदर कार्यक्रमात श्री. संजय काळे, श्री. मनोज वनकर, श्री. राकेश कन्नाके, श्री. भूषण माहूरपवार, श्री. प्रभाकर मत्ते, श्री. श्रीरंग बोंबले, श्री. सुनील कांबळे, श्री. संदेश दहागावकर, प्रतीक चौहान, अनुज मोहुर्ले, व अन्य तुकडोजी महाराजांवर प्रेम करणारे भाविक यांचे सहकार्य लाभले.