Sunday, December 7, 2025
HomeSpardhaकेजीएन शाळेच्या वंशची निवड 12 फेब्रुवारीला नागपुरात विभागीय क्रीडा स्पर्धेत खेळणार.
spot_img

केजीएन शाळेच्या वंशची निवड 12 फेब्रुवारीला नागपुरात विभागीय क्रीडा स्पर्धेत खेळणार.

केजीएन शाळेच्या वंशची निवड 12 फेब्रुवारीला नागपुरात विभागीय क्रीडा स्पर्धेत खेळणार. 

श्रेयश वानखेडे:
महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाअंतर्गत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, चंद्रपूर यांच्या मार्फत 4 जानेवारी रोजी पोलीस मैदान, चंद्रपूर येथे जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सव व क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या, यामध्ये केजीएन स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय,बल्लारपूर चा इयत्ता 10 वीच्या विद्यार्थी वंश झिलकलवार याने सहभाग घेत 12 ते 19 वर्षे वयोगटात गोला फेक स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक पटकावला.
त्याला जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री दीपक बनाईत यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व कांस्य पदक प्रदान करण्यात आले.
शाळेचे क्रीडा शिक्षक रमेश नटरगी यांच्या मार्गदर्शनाखाली वंशने यश संपादन केले.
शाळेचे संस्थापक शेख मेहमूद, मुख्याध्यापिका सुजाता करमनकर, उपमुख्याध्यापिका सीमा माकडे, शाळेच्या प्रशासक झीनत खान, श्वेता डोनवर आदींनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page