भवानजीभाई चव्हाण विद्यालयात जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनातील यशस्वी प्रतिभावंतांचा गौरव
श्रेयश वानखेडे:
राज्य विज्ञान शिक्षण संस्था रविनगर नागपुर तसेच जिल्हा परिषद शिक्षण विभाग चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ” शाश्वत भविष्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान ” या मुख्य विषयावर 52 वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन 2024- 25 व उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम 2022 ते 2027 अंतर्गत ” जिल्हास्तरीय उल्हास मेळावा ” चे आयोजन दिनांक 12, 13 व 14 जानेवारी 2025 या कालावधीत भवानजीभाई चव्हाण हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय चंद्रपूर येथे करण्यात आले.. या विज्ञान प्रदर्शनातील बक्षीस वितरण सोहळा दिनांक14 जानेवारी 2025 रोज मंगळवारला पार पडला. या बक्षीस वितरण समारंभाप्रसंगी मंचावर शिक्षणाधिकारी माध्य. श्री राजेश पातळे सर, उपशिक्षणाधिकारी निखिता ठाकरे मॅडम, शाळेचे प्राचार्य जे. एम. टोंगे सर विज्ञान प्रदर्शनातील परीक्षक डॉ गणेश जामणकर सर, डॉ. उमाकांत देशमुख सर, प्रा. सुभाष किन्नाके सर, श्री प्रकाश गौरकार सर, प्रा. शरद कुत्तरमारे सर, श्री सुधाकर ढवस सर, प्रा. संदीप कासवटे सर, श्री विजय तराळे सर, श्रीमती प्रज्ञा लोखंडे मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी विज्ञान प्रदर्शनाचे परीक्षक डॉ गणेश जामणकर सर यांनी विज्ञान प्रदर्शनामुळे बाल संशोधकांच्या जिज्ञासेला चालना मिळते असे विचार व्यक्त केले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षणाधिकारी माध्यमिक राजेश पातळे सर यांनी ” प्रत्येक मुलांमध्ये संशोधक लपलेला असतो विज्ञान प्रदर्शन हे त्याला जागृत करण्यासाठी उत्तम व्यासपीठ आहे असे विचार अध्यक्षीय भाषणांतून व्यक्त केले. ” सदर विज्ञान प्रदर्शनात जिल्हाभरातून 195 विज्ञान प्रतिकृती आणि बाल संशोधक सहभागी झाले होते, त्यापैकी प्राथमिक गट बिगर आदिवासी 6 ते 8 मध्ये कल्पित आनंद नागापुरे, द्वितीय कु. सुनेशी विनोद भोंगळे, तृतीय गणेश सुनील धुळसे, माध्यमिक गट 9-12 प्रथम मृणल दिनेश वरघणे, द्वितीय निखिल राजेश मिश्रा, तृतीय आर्यन प्रमोद सातपैसे. प्राथमिक गट शिक्षक प्रथम कु. मुसरत जहाअली मोहम्मद खान, माध्यमिक गट शिक्षक प्रथम सौ. कल्पना विलास बांदुरकर, प्रयोगशाळा सहाय्यक गट श्री गणेश प्रभाकर बदखल, आदिवासी क्षेत्र प्राथमिक 6 ते 8 गट प्रथम कु. भारती किशोर शास्त्रकार, माध्यमिक गट 9 ते 12 प्रथम मंगेश रमेश सहारे, दिव्यांग विद्यार्थी गट 6 ते 8 प्रथम प्रिती मनोज खोबरे, माध्यमिक गट 9-12 प्रथम तन्वी श्रीहरी चौधरी या प्रतिभावंतांना गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तथा आभार प्रदर्शन श्री अविनाश जुमडे सर ह्यांनी केलें. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे प्राचार्य जे.एम टोंगे सर, उपमुख्याध्यापक श्रीमती मुप्पीडवार मॅडम, पर्यवेक्षक श्री डी. एल. कुरेकार सर, श्रीमती जवादे मॅडम, श्रीमती ईरपाते मॅडम शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि स्वयंसेवक विद्यार्थी ह्यांनी मोलाचे सहकार्य केले.