Wednesday, July 29, 2026
HomeKorpana*पोलीस स्टेशन कोरपना यांची धडक कारवाई - १० गोवंशीय जनावरांची सुटका, वाहनासह...
spot_img

*पोलीस स्टेशन कोरपना यांची धडक कारवाई – १० गोवंशीय जनावरांची सुटका, वाहनासह मुद्देमाल जप्त*

*पोलीस स्टेशन कोरपना यांची धडक कारवाई – १० गोवंशीय जनावरांची सुटका, वाहनासह मुद्देमाल जप्त*

*ज्योत्स्ना वानखेडे*
*घडलेली घटना:*
पोलीस स्टेशन कोरपना हद्दीत दि. १५/०७/२०२६ रोजी गोपनीय माहितीच्या आधारे पेट्रोलिंग दरम्यान सायंकाळी सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास टाटा योद्धा १७०० वाहन क्र. *MH-34-BZ-5431* हे वाहन संशयास्पदरित्या भरधाव वेगाने जात असल्याचे आढळून आले. पोलिसांनी वाहनाचा पाठलाग करून ते ताब्यात घेतले.
*तपासात आढळले:*
वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये *१० गोवंशीय जनावरे* अत्यंत क्रूरपणे दोरीने तोंड व पाय बांधून कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले. याबाबत पंचनामा करून वाहनासह गोवंशीय जनावरे ताब्यात घेण्यात आली.
*जप्त मुद्देमाल:*
1. १० गोवंशीय जनावरे – अंदाजे किंमत *₹१,००,०००/-*
2. टाटा योद्धा वाहन – किंमत *₹२,६०,०००/-*
*एकूण जप्त मुद्देमाल: ₹३,६०,०००/-*
*गुन्हा नोंद:*
या प्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध खालील कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे:
– महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, १९७६ (सुधारित २०१५) – कलम ५(अ), ५(ब), ६, ९, ११(१)(ड)
– प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम, १९६०
– मोटार वाहन अधिनियम, १९८८ – कलम १८४
*पोलिसांची भूमिका:*
पोलीस स्टेशन कोरपना यांच्याकडून करण्यात आलेल्या या तत्पर कारवाईमुळे गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात यश आले असून अवैध जनावर वाहतुकीवर प्रभावी आळा घालण्यात आला आहे.
*कारवाईचे मार्गदर्शन:*
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपनी सा. चंद्रपूर, मा. अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे सा. चंद्रपूर, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. रविंद्र जाधव सा. चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात करण्यात आली.
कारवाई करणारे अधिकारी:
पोलीस निरीक्षक लता  वाढीवे मॅडम, वायपोअं विक्रम दासरवार ब.नं. १५८६, पोअं सटवा नामपल्ले ब.नं. ५५४, पोअं विशाल मोरे ब.नं. १६५६
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page