सेलूत केमिस्ट भवन उभारणीसाठी सहकार्य करू-नामदार मेघना बोर्डीकर.
सेलूत रक्तदान शिबीराला मोठा प्रतिसाद.
श्रेयश वानखेडे:
रक्तदान शिबीरे ही काळाची गरज असून सामाजिक उत्तरदायित्व म्हणून तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे तसेच ती एक चळवळ झाली पाहिजे त्यासाठी आपण सेलूत केमिस्ट भवनाच्या उभारणी साठी सहकार्य करू असे प्रतिपादन राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी केले.अखिल भारतीय व महाराष्ट्र केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथआप्पा शिंदे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसा निमित्य परभणी जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या अंतर्गत सेलू तालूका केमिस्ट असोसिएशन च्या वतीने येथील साईनाट्य गृह परिसरात शुक्रवार दिनांक 24 जानेवारी रोजी आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन करताना त्या बोलत होत्या.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती दिनकर वाघ, डॉ ऋतुराज साडेगावकर , डॉ संजय रोडगे, ॲड दत्तराव कदम, अशोक अंभोरे, शिवाजीराव खेडकर,सुंदरराव गाडेकर , नामदेव पांचाळ, अजय डासाळकर, संदीप टाक , केदार गजमल यांची उपस्थिती होती. या रक्तदान शिबीरात 300 रक्तदात्यांनी रक्तदान करून रक्त दानाचा उच्चांक नोंदवला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्य क्ष सदीप टाक सुत्र संचालन सुभाष मोहकरे तर कैलास काळे यांनी आभार मानले. शिबीराच्या यशस्वीतेसाठी परभणी मेडीकल कॉलेज चे डॉ राकेश शिंगदणे, दत्ता रासवे,
रामा रेंगे, मंजेस खिल्लारे, तेजस पतंगे, आकाश भालेराव, विकास रहाटकर, मकरंद कुलकर्णी, जयश्री कांबळे, प्रतिक्षा कदम यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच सुनीलबापु डख, माणिकराव डख, शिवनारायण मालाणी, प्रेमराज चव्हाण, मुकेश खेडेकर, समिर नाईक वाडे, प्रविण लोया, सतीश मुरकुटे, शौकत बागवान शेख आमजद, गणेश साडेगावकर , लक्ष्मण पौळ, चंद्रकांत गटकळ, दिपक मंत्री, स्वप्नील जाधव, सोळके, गबाळे , गात यांच्यासह मेडीकल असो.च्या सर्व पदाधिकारी व सदस्यां नी परिश्रम घेतले.