Saturday, May 2, 2026
HomeMaharashtraसांज चिमणी पाखरांची सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न.
spot_img

सांज चिमणी पाखरांची सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न.

सांज चिमणी पाखरांची सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न.

श्रेयश वानखेडे:
सेलू तालुक्यातील जवळा जिवाजी येथे दिनांक 24 जानेवारी 2025 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जवळा (जिवाजी) ता.सेलू येथील विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये पहिली ते पाचवीच्या ७९ विद्यार्थ्यांनी विविध ३५ गीतांवर नृत्याविष्कारा चे सादरीकरण केले. विविध गीतांनी रसिकांची मने जिंकली. या वेळी उपस्थित पालक व गावकरी यांनी मुलांचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या शेवटी गावकऱ्यांनी मुलांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था केली होती. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे रामेश्वर खरात, अशोकराव खरात, विजय खरात, सतीश प्रधान, सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. अप्रतिम कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  लखन खरात, हनुमान भुजबळ, अंगद खरात, रवी खरात, सोपान गरड यांनी सहकार्य केले. मुख्याध्यापक सुनील नवले यांनी संचलन तर  प्रवीण कुलकर्णी आणि अमोल बावणे यांनी परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वी केला.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page