Thursday, August 6, 2026
spot_img
HomeEducation*मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बल्लारपूर येथे गणवेश वितरण व...

*मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बल्लारपूर येथे गणवेश वितरण व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा*

*मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बल्लारपूर येथे गणवेश वितरण व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा*

*ज्योत्स्ना वानखेडे*:
मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बल्लारपूर येथे गणवेश वितरण व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा साजरा करण्यात आला. या सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून मा. इब्राहिम जव्हेरी सर (सहसचिव, बल्लारपूर सेवा समिती)प्रमुख अतिथी म्हणून मा. डॉ.अर्जुन पावरा सर (उपविभागीय अधिकारी बल्लारपूर) व मा. श्री विशाल वाघ सर (मुख्याधिकारी नगरपरिषद बल्लारपूर) तसेच ॲड.इब्राहिम जव्हेरी सर (सचिव, बल्लारपूर सेवा समिती), शाळेच्या प्राचार्या असमा खान मॅडम तसेच मुख्याध्यापिका रेहना अली मॅडम हर्षा वरगंटवार मॅडम उपस्थित होत्या. सर्व मान्यवरांनी विद्येची देवता माता सरस्वती व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला दीप प्रज्वलन करून माल्याअर्पण केले. माननीय इब्राहिम सर यांनी प्रमुख अतिथी यांना शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सर्व मान्यवरांचे स्वागत गीत व स्वागत नृत्य करून विद्यार्थ्यांनी स्वागत केले. यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश वितरण करण्यात आले व गुणवंत विद्यार्थ्यांचा सर्टिफिकेट प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा पद्मवार मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन वंदना मॅडम यांनी केले. या कार्यक्रमास सर्व विद्यार्थी , शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page