Tuesday, May 5, 2026
HomeChandrapurपोंभुर्णा आणि गोंडपिपरी तालुक्‍यातील करंजी एमआयडीसीमध्‍ये प्‍लग अॅन्‍ड प्‍ले या धर्तीवर आदिवासी...
spot_img

पोंभुर्णा आणि गोंडपिपरी तालुक्‍यातील करंजी एमआयडीसीमध्‍ये प्‍लग अॅन्‍ड प्‍ले या धर्तीवर आदिवासी औद्योगिक क्षेत्र विकसित करण्‍याचा निर्णय शासनाने त्वरित घ्यावा

पोंभुर्णा आणि गोंडपिपरी तालुक्‍यातील करंजी एमआयडीसीमध्‍ये प्‍लग अॅन्‍ड प्‍ले या धर्तीवर आदिवासी औद्योगिक क्षेत्र विकसित करण्‍याचा निर्णय शासनाने त्वरित घ्यावा

आ सुधीर मुनगंटीवार यांची शासनाला मागणी

Shreyash Wankhede:

चंद्रपूर जिल्‍हयातील पोंभुर्णा आणि गोंडपिपरी तालुक्‍यातील करंजी येथील एमआयडीसीमध्‍ये प्‍लग अॅन्‍ड प्‍ले या धर्तीवर आदिवासी औद्योगिक क्षेत्र विकसित करण्‍याचा निर्णय शासनाने त्वरित घ्यावा अशी मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी प्रजासत्‍ताक दिनानिमीत्‍त पालकमंत्री ना अशोक उईके यांनी जिल्‍हयातील लोकप्रतिनिधींची बैठक घेतली व विविध प्रश्नावर चर्चा केली.या बैठकीत जिल्‍ह्यातील आदिवासी तरूण-तरूणींना उद्योजक करण्‍यासाठी आदिवासी औद्योगिक विकास क्षेत्र  निर्माण करण्‍याची मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली.पालकमंत्री ना. उईके यांनी या सुचनेला सकारात्‍मक प्रतिसाद देत कार्यवाही करण्‍याबाबत बैठकीत आश्‍वस्‍त केले.

या बद्दल शासनाला पाठविलेल्या निवेदनात आ सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे की आपण स्‍वातंत्र्याचा अमृतमहोत्‍सव साजरा केला. मात्र आदिवासी युवकांच्‍या सर्वांगिण विकासासाठी होणारे प्रयत्‍न जलदगतीने होत असताना दिसत नाही, असे निदर्शनास आले आहे. सन २०१४ ते २०१९ या काळात मिशन शौर्य हा उपक्रम आपण आदिवासी तरूण-तरूणींसाठी राबविला. आदिवासी विद्यार्थ्‍यांना नामांकित शाळांमध्‍ये शिक्षण घेण्‍याची सोय उपलब्‍ध करून दिली. पेसा गावांना थेट निधी उपलब्‍ध करून देत आदिवासी बहुल गावांच्‍या विकासाचा मार्ग प्रशस्‍त केला. तेंदुपत्‍ता मजुरांच्‍या बोनसचा प्रश्‍न निकाली काढला. आदिवासी तरूण-तरूणींना उद्योजक करणे हे आपले आगामी ध्‍येय आहे.

यासाठी चंद्रपूर जिल्‍हयातील पोंभुर्णा आणि गोंडपिपरी तालुक्‍यातील करंजी येथील एमआयडीसीमध्‍ये प्‍लग अॅन्‍ड प्‍ले या धर्तीवर आदिवासी औद्योगिक क्षेत्र विकसित करण्‍याचा निर्णय आपल्‍या विभागाने घेतल्‍यास हा निर्णय आदिवासी तरूण-तरूणींच्‍या आयुष्‍यात उद्योजकतेचा प्रकाश निर्माण करणारा ठरेल याचा मला विश्‍वास आहे. हा निर्णय घेताना केपीएमजी किंवा तत्‍सम नामांकित अभ्‍यास संस्‍थांच्‍या माध्‍यमातुन सर्व्‍हे करून प्रोजेक्‍ट रिपोर्ट तयार करण्‍यात यावा व त्‍या माध्‍यमातुन हा निर्णय घेण्‍यात यावा अशी सूचना देखील आ मुनगंटीवार यांनी केली आहे.

पोंभुर्णा आणि करंजी या एमआयडीसीमध्‍ये प्‍लग अॅन्‍ड प्‍ले या धर्तीवर आदिवासी औद्योगिक क्षेत्र विकसित करण्याचा निर्णय घेतल्यास आदिवासी तरुणांच्या आर्थिक सक्षमीकरणा संदर्भात महत्वपूर्ण पाऊल ठरेल असेही आ मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

 

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page