गौरक्षण वार्ड मधे 76 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम हनिशाताई दुधे यांच्या शुभ हस्ते संपन्न
श्रेयश वानखेडे:
भारतीय प्रजासत्ताक दिवस हा दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे.’भारताचे संविधान’ समितीने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारले व २६ जानेवारी १९५० रोजी पासून भारतीय संविधान अंमलात आले. असे पत्रकार व समाजसेवीका हनिशा दुधे यांनी मनोगतात म्हटले व यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. गौरक्षण वार्डातील उपस्थित नीरज झाड़े, मनोज गेडाम, राहुल फासलावार, मनोज शेंडे, बंडु जिल्लाला, सचिन बोगुटावार, प्रदिप निमगडे, तुषार उईके, सुरज चन्ने, प्रतिष्टीत नागरिक व युवा मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी प्रजासत्ताक दिनाचे मान्यवरांनी महत्व जाणून माहिती दिली.