महात्मा ज्योतीबा फुले हिंदी, उर्दू, तेलुगू विद्यालय, बल्लारपूर येथे शहीद दिन निमित्त सर्वधर्म प्रार्थना सभेचे आयोजन करून शहिदांना विनम्र अभिवादन

श्रेयश वानखेडे:
कार्यक्रमाचे संचालन तथा प्रास्ताविक श्री रवी अन्सुरी सर यांनी केले. विद्यार्थ्यांनी हिंदू, मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन धर्माची प्रार्थना प्रस्तुत केली. श्री अजयपाल सूर्यवंशी सर यांनी ‘वैष्णव जन’ हे गांधीजींचे प्रिय भजन सादर केले तथा श्री रवी अन्सूरी सर यांनी ‘साबरमती के संत तुने कर दिया कमाल’ हे गीत प्रस्तुत केले. ठीक अकरा वाजता दोन मिनिटे मौन पाळून शहिदांना विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करता सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम केले.








