नगरपरिषद बल्लारपूर अंतर्गत येणाऱ्या सुलभ शौचालयात सुविधांचा अभाव
स्वच्छ सर्वेक्षण 2022 नुसार नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या वस्ती विभागातील सुलभ शौचालयात सुविधांचा अभाव दिसून आले असल्याची चर्चा आहे.
या ठिकाणी फक्त पाण्याची व्यवस्था आहे परंतु साबण, निर्माण, फिनाईल, ऍसिड, झाडू व खराटा हे तेथील काम पाहणारे आपल्या पैशाने आणत असल्याची चर्चा आहे. ठेकेदार मात्र या सर्वांचे बिल सुविधा उपलब्ध करून न देता काढत असल्याची चर्चा सुरू आहे.
अधिकची विचारणा केली असता काम पाहणाऱ्यांनी सांगितले की, आज-काल शौचालयाला येणाऱ्या लोकांची संख्या कमी झाली आहे त्यामुळे हे सर्व घडत आहे जेवढा प्रॉफिट पाहिजे तेवढा होत नाही अशी चर्चा सुरू आहे. अशा कारणाने कारवा रोड कडे जाणारे सुलभ शौचालय बंद पडल्याची चर्चा सुरू आहे.