बोराडे परिवाराकडून हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न.
अश्वरुढ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे आकर्षण.
श्रेयश वानखेडे :
सेलू शहरातील शास्त्री नगर भागात बोराडे कुटुंबाच्या वतीने दि 1 फेब्रुवारी करण्यात आले होते.
आदर्श नगर भागातील माजी नगरसेविका उर्मिला विनोदराव बोराडे, विजया मुकेश राव बोराडे,नयना साई राज बोराडे,आणि बोराडे परिवाराच्या वतीने शनिवारी सायंकाळी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरूढ शिवछत्रपती यांचा पुतळा व छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मापासून ते पराक्रमापर्यंत छाया चित्रातून प्रदर्शन करण्यात आले.
शिवछत्रपती यांचे जीवन चरित्र पाहून महिलांनी आनंद व्यक्त केला. तसेच सादर केलेल्या विविध गीतांनी मराठी हिंदी गीतांचा बहाद्दर कार्यक्रम सादर करण्यात आला विनोद बोराडे मित्र मंडळ व साईराज बोराडे मित्र मंडळाच्या सर्व
कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.