बल्लारपुर येथे एक दिवसीय धम्म शिबीर संपन्न
श्रेयश वानखेडे:
त्रिरत्न बौद्ध महासंघ बल्लारपुर द्वारा आयोजित “एक दिवसीय धम्म शिबीर” मिलिंद बालवाडी बल्लारपुर येथे रविवार दि. 19 फेब्रुवारी 2025 ला संपन्न झाले. या शिबिराचे नेतृत्व धम्मचारी पुष्पप्रभा (वर्धा) यांनी केले. “मार म्हणजे काय” या विषयानुषंगाने “क्लेश मार, मृत्यु मार, स्कंध मार आणि देवपुत्र मार” याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. भोजन अवकाशानंतर दुस-या सत्रात प्रश्नोत्तरातुन सखोल मार्गदर्शन केले. सुरुवातीला धम्ममित्र प्रतिज्ञा वानखेडे, भावना उमरे यांनी त्रिशरण पंचशील,विधायक पंचशील बुद्ध पुजा घेतली.तर मैत्रीभावना ध्यान साधना धम्ममीत्र चारुशिला ब्राम्हणे यांनी घेतली.संचालन धम्ममीत्र संध्याताई गावंडे यांनी केले. आभार प्रदर्शन प्रेरणा वानखेडे यांनी केले. धम्मपालन गाथेने शिबीराची सांगता करण्यात आली. लोहेश्वर ज़ुमडे आणि मनोहर दुपारे यांनी खूप आकर्षक पूजास्थान बनवीले. या शिबिराला चंद्रपुर आणि बल्लारपुरातील धम्ममित्र व धम्मसहायक मोठ्या संख्येनी उपस्थित होते.