Saturday, May 2, 2026
HomeSanghtanaभारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुका मध्ये उपवर - वधु परिचय मेळावा...
spot_img

भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुका मध्ये उपवर – वधु परिचय मेळावा संपन्न.

भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुका मध्ये उपवर – वधु परिचय  मेळावा  संपन्न. 

श्रेयश वानखेडे:         

दि.16/02/2025 रोज रविवार ला बुध्द भूमी बस स्टॉप समोर राजुरा तालुक्यांमध्ये बौध्द धर्मिय उपवर वधु मेळाव्याचे आयोजन पहिल्यांदाच करण्यात आले. सर्व प्रथम तथागत गौतम बुध्द व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार, मेणबत्ती, अगरबती लाऊन दीप प्रजलित करण्यात आले.

सामूहिक त्रिशरण पंचशील व संविधान उद्देशिका चे वाचन घेण्यात आले. मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमात आयु. किशोर तेलतुंबडे जिल्हाध्यक्ष यांच्या हस्ते उद्घाटन करून मार्गदर्शन केले. प्रमुख मार्गदर्शिका आयु.नी. सुजाताताई लाटकर, आयु .नी.सपनाताई कुंभारे केंद्रीय शिक्षिका चंद्रपूर यांनी आपल्या मार्गदर्शन मध्ये राजुरा तालुक्यामध्ये व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली सामाजिक संस्था भारतीय बौध्द महासभा तालुका राजुरा कडून महाराष्ट्र मध्ये पहिल्यांदाच बौध्द धर्मिय उपवर वधु परिचय मेळावा व समाज प्रबोधन घेण्यात आला. या करिता राजुरा तालुक्याचे अध्यक्ष आयु.धर्मुजी नगराळे व  सर्व पदाधिकारी यांचे अभिनंदन केले. या वर वधु परिचय मेळाव्या मधून मुला मुलींना आपला जोडीदार निवडण्याची संधी मिळत असते. या माध्यमातून मुला मुलीच्या शिक्षण, अपेक्षा काय असतात हे माहीत होते व काय असायला पाहिजे एकमेकांच्या समस्या जाणून समजून घेऊन योग्य जोडीदार चांगली वागणूक, आर्थिक, सामजिक, नैतिक, भौतिक सर्व गुण संपन्न नसतात. परंतु एकमेकांना आपला संसार कसा सुख समृध्दीने जगता येईल या बद्दल मार्गदर्शन करताना सर्व पदाधिकारी, उपासक, उपासिकाचे आभार व्यक्त केले.

आयु.धर्मुजी नगराळे यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुक्यामध्ये बौध्द धमाच्या प्रचार प्रसार करण्याकरीता भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुक्याच्या अध्यक्ष यांच्या कडून प्रबोधन करण्यात आले. या मेळाव्यामध्ये 116 वर -वधु व त्यांच्या आई, वडील यांनी आपला  मुला मुलींच्या परिचय  दिला. त्यानंतर विशेष उपस्थित मध्ये आयु. संदीप सोनेने, गुरुबालक मेश्राम, अशोक पेरकावार, कुषणाक पेरकावार, कुशनदास गजभिये, गौतम देवगडे, प्रभाकर लोखंडे, मुरलीधर ताकसांडे, संतोष कांबळे, पुरूसोत्तम वनकर, उत्तम रामटेके, रवींद्र खैरे, दिनेश घागरगुंडे,  धोटे, किशोर रायपुरे, आयु.नी.गायत्री रामटेके, किरण खैरे, वंदना देवगडे,विलेखा उपरे,अनुकला वाघमारे,जिजाबाई बांबोळे,सुजाता नळे,स्वीटी  रामटेके, संगीता शेंडे प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमाचे स्वागत गीत आयु.अशोक दुबे, प्रास्ताविक आयु.भीमराव खोब्रागडे, उत्कृष्ट संचालन आयु.गौतम जुलमे व आभार प्रदर्शन आयु.गौतम चौरे यांनी केले या कार्यक्रमाला राजुरा तालुक्यातील बहुसंख्य संख्येने उपस्थित होते.शेवटी सरणत्य घेऊन नंतर भोजन दान देऊन कार्यक्रम समाप्त करण्यात आला.

 

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page