Monday, April 20, 2026
HomeFestivalsगजानन महाराज देवस्थान चंद्रपूर येथे उपशास्त्रीय गीतांची संगीत संध्या संपन्न
spot_img

गजानन महाराज देवस्थान चंद्रपूर येथे उपशास्त्रीय गीतांची संगीत संध्या संपन्न

गजानन महाराज देवस्थान चंद्रपूर येथे उपशास्त्रीय गीतांची  संगीत संध्या  संपन्न

श्रेयश वानखेडे:
दिनांक 26 फेब्रुवारी 2025 रोजी महाशिवरात्रीनिमित्त आयोजित संगीत संध्या कार्यक्रमात कार्यक्रमाचे सुरुवातीस श्री दिलीप दातारकर यांनी यमन रागातून जय जय राम कृष्ण हरी या बीज मंत्रान सुरुवात करून पुंडलिक वरदान व  पंढरीचा वास चंद्रभागे स्नान या अभंग गायनाने आपली सेवा सादर केली.. उत्कृष्ठ अशी हार्मोनियम साथ श्रीमान डॉ. शिंदे साहेब तर तबला साथ श्रीमान तोडासे साहेब यांची होती.
बल्लारपूर बामणी येथील भजन सम्राट श्रीमान रविकांत राठोड सर यांनी आपल्या भारदस्त आवाजातून सर्व रसिकांना मंत्रमुग्ध केले.  बालाजी हायस्कूल बामणी येथील कार्यरत संगीत शिक्षक श्रीमान संजयजी नासिरकर सर यांनी आपल्या गोड आवाजातून गण गण गणात बोते हे गजानन महाराजांचे स्व रचीत भजन गाऊन चंद्रपूर वासियांना रिजविले. साई महाराजांचे भजन सुध्दा या वेळी सादर करून साक्षात  शिर्डी चे साई बाबा व शेगाव चे गजानन महाराज अवतरल्याचा भास झाला.
सत्र शेवटी  चंद्रपूर नगरीतील ज्येष्ठ कलावंत श्रीमान  संजयजी राजगडे सर यांनी आपल्या सुमधुर आवाजातून एक से बढकर एक  अश्या सर्व प्रकारातील गीतांचा व  गझलांचा मारा करून संगीत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.  विदर्भातील उत्कृष्ठ तबला वादक म्हणून ख्याती असलेले श्रीमान सतीशजी  कवरासे यांनी  सर्व  संगीत मैफली मध्ये  उपस्थित रसिकांचे मनात आपल्या तबल्या ची छ्याप  ठेऊन गेले. या संगीत मैफलीचे आयोजन तथा कार्यक्रमाचे सूत्र संचालन  आपल्या ग्रुप मधील संगीत प्रेमी आदरणीय श्री गाठे साहेब यांनी केले होते.अशी माहिती श्री रवि अनसुरी सरांनी दिली.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page