Tuesday, July 28, 2026
HomeChandrapurपोंभुर्णा एमआयडीसी साठी संपादित शेतजमीनीसाठी संबंधित शेतकऱ्यांना रु.२.२१ कोटी वितरित
spot_img

पोंभुर्णा एमआयडीसी साठी संपादित शेतजमीनीसाठी संबंधित शेतकऱ्यांना रु.२.२१ कोटी वितरित

पोंभुर्णा एमआयडीसी साठी संपादित शेतजमीनीसाठी संबंधित शेतकऱ्यांना रु.२.२१ कोटी वितरित

आ. मुनगंटीवार यांच्या तारांकित प्रश्नाला उद्योग मंत्री उदय सामंत यांचे उत्तर

Shreyash Wankhede:

पोंभुर्णा तालुक्यातील कोसम्बी रिठ येथील एम आय डी सी साठी संपादित शेतजमिनींचा  मोबदला संबंधित शेतकऱ्यांना देण्यासाठी उच्चाधिकार समितीच्या दि. १९.१०.२०१८ रोजी संपन्न झालेल्या ९८ व्या बैठकीमध्ये रु.१०,००,०००/-प्रती हेक्टरी दरास मान्यता प्रदान करण्यात आली आहे. त्यानुषंगाने सदर प्रकरणी मऔवि महामंडळाच्या दि.०५.०८.२०१९ च्या पत्रान्वये भूसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, गोंडपिपरी यांना रु.०६,०७,५२,६६२/- इतकी रक्कम भूसंपादनकामी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अद्यापपर्यंत संबंधित शेतकऱ्यांना रु.२.२१ कोटीचे वाटप करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ अन्वये भूसंपादनाची कार्यवाही करण्यात येत आहे, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.

कोसंबी रिठ (ता.पोंभुर्णा, जि. चंद्रपूर) येथील शेतकऱ्यांची शेतजमीन एमआयडीसीसाठी संपादीत करण्यात आली असून अद्याप उक्त जमिनीचा मोबदला संबंधितांना देण्यात आला नसल्याची बाब आ. सुधीर मुनगंटीवार यांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून निदर्शनास आणली. म.ओ.वि.मं. अधिनियम १९६१. ३२ (२) अन्वये भूमीअधिग्रहण प्रकल्पबाधित भूखंड भोगवटाधारकांना दर हेक्टरी ८० लक्ष रूपये भाव देण्यात यावा किंवा उक्त भूखंड भूसंपादन प्रक्रियेमधून वगळण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केल्याचे देखील आ. मुनगंटीवार यांनी उपप्रश्नाच्या माध्यमातून निदर्शनास आणले.महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ अन्वये भूसंपादनाची कार्यवाही करण्यात येत आहे असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page