Monday, July 6, 2026
HomeParbhaniदर्पण दिनानिमित्त सेलू तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान.
spot_img

दर्पण दिनानिमित्त सेलू तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान.

दर्पण दिनानिमित्त सेलू तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान.

विनोद बोराडे व साईराज बोराडे मित्र मंडळाचा स्तुत्य उपक्रम. 

श्रेयश वानखेडे: 
दि.7 मार्च रोजी सेलू येथील लोकप्रिय माजी नगराध्यक्ष विनोदरावजी बोराडे, साईराज बोराडे परिवाराकडून दरवर्षी प्रमाणे यंदाही दर्पण दिनानिमित्त तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात येत असतो. यावर्षी पण  तो सत्कार समारंभ काही कारणास्तव थोड्या उशीरा का होईना तो घेण्यात आला. या कार्यक्रमास तालुक्यातील सर्व पत्रकारांनी विनोद बोराडे मित्रमंडळाचे निमंत्रण स्वीकारून सन्मान स्वीकारला, माजी नगराध्यक्ष विनोदराव बोराडे यांचा सर्व पत्रकार बांधवांनी अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे राज्यस्तरीय अधिवेेशनाचे स्वागताध्यक्ष पद स्वीकारले होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्यांचा सिंहाचा वाटा होता त्यामुळे अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे सेलू तालुकाध्यक्ष लक्ष्मण बागल,जेष्ठ पत्रकार कांचन कोरडे,महंमद इलीयास,डॉ. शिवाजी शिंदे,मोहसीन मामू आदी पत्रकार बांधवानी त्यांचा शाल पुष्पहार घालून सत्कार केला.यावेळी कार्यक्रमामध्ये काही अजून सत्कार करण्यातआले. यामध्ये डॉ.शिवाजी शिंदे यांना डॉक्टरेट व इंद्रप्रस्थ नॅशनल अवॉर्ड मिळाल्या बद्धल, रामेश्वर गटकळ सर यांना केंद्र स्तरावरील इंद्रप्रस्थ नॅशनल अवॉर्ड मिळाल्या बद्दल, मधुसूदन उपाध्याय याचे SRPF मध्ये निवड झाल्या बद्दल, मयूर डख MBBS.MD झाल्याबद्दल, व कु.स्वस्ति काला हिचे राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी सेलू तालूका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष तथा यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा.मुकेश हरिभाऊ काका बोराडे,साईराज बोराडे,प्रतिक बोराडे,राजेंद्र पवार मित्र मंडळाचे सर्व सदस्य आदी  यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी राम सोनवणे श्रीपाद कुलकर्णी, मोहन बोराडे  आदिनी आपली मनोगते व्यक्त केली. विनोद बोराडे व साईराज बोराडे यांच्या वतीने सर्व पत्रकारांना शाल पुष्पहार घालून भेट वस्तू  देऊन सन्मान केला.
कार्यक्रमाची सांगता पत्रकार डॉ. विलास मोरे यांच्या गीताने झाली.आभार प्रदर्शन परभणी जिल्हा काँग्रेस सरचिटणीस तथा माजी नगरसेवक मिलिंद सावंत यांनी केले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page