Thursday, April 16, 2026
HomeParbhaniरेणूका क्लिनीक तर्फे दोनसे पन्नास रुग्णांची बी. एम. डी. तपासणी.
spot_img

रेणूका क्लिनीक तर्फे दोनसे पन्नास रुग्णांची बी. एम. डी. तपासणी.

रेणूका क्लिनीक तर्फे दोनसे पन्नास रुग्णांची बी. एम. डी. तपासणी.

डॉ. दिगंबर तु.घोडके यांचा स्तुत्य उपक्रम. रुग्णांचा भरभरून प्रतिसाद. 

श्रेयश वानखेडे:
सेलू येथील रेणूका क्लीनिक तर्फे दि. 9 मार्च रविवार रोजी डॉ.दिगंबर घोडके यांनी रुग्णांची बीएमडी तपासणी शिबिराचे आयोजन केले होते.ज्या रुग्णाचे वय हे 15 वर्षा पेक्षा जास्त आहे व ज्यांना कंबर दुःखी, अंग दुखी व गुडघे दुखी, कमजोरी,थकवा येत असेल, सांधे दु:खी होत असेल,ज्यांच्या हाता पायला मुंग्या येतात, हात सुन्न होते, चक्कर येत असेल अश्या अनेक आजार असतील अश्या सर्व रुग्णांची तपासणी करण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या सर्व आजारासाठी  लागणारा तपासणी खर्च दवाखान्यात रुपये 1500/- लागतो.जो सर्व सामान्य रूग्णांना परवडतं नाही किंवा गरजेपोटी तो करावाच लागतो.  परंतु डॉ.दिगंबर घोडके  ह्यांनी नेहमीच सामाजिक भान ठेऊन आपल्या रेणूका क्लिनीक च्या  मार्फत रुग्णांना कमीत कमी मोबदल्यात जास्तीत जास्त सेवा देण्याचे सामाजिक कार्य केले आहे. या अगोदर पण त्यांनी अनेक आजारा वर रुग्णांना उपचार मिळावेत म्हणून मोठं मोठाल्या  शहरातील नामांकित डॉक्टरांना बोलावून शिबीराचे आयोजन करून रुग्णाची सेवा करण्याचे कार्य केले होते.  त्या नुसार काल छत्रपती संभाजी नगर हून संपूर्ण हाडाची तपासणी करण्यासाठी बीएमडी तपासणी यंत्र बोलावून दोन ऑपरेटर च्या मदतीने सकाळी 9:30 वाजता तपासणी शिबीराचे उद्घाटन सोहळा संपन्न करून तपासनीस सुरवात केली.
या तपासणीसाठी सेलू तालुक्यातील नव्हे तर इतर जिल्ह्यातील रुग्ण ही आले होते.सकाळ पासून तपासणीसाठी रुग्णांनी गर्दी केली होती.तपासणीसाठी ज्या रुग्णांनी नोंद केली होती अश्या सर्व रुग्णांची तपासणी अगोदर करण्यात आली.ऐनवेळी अनेक रुग्ण आले होते त्यातील काही जणांची तपासणी करण्यात आली. तपासणी यंत्राची मर्यादा लक्षात घेता 250 रुग्णांची तपासणी करता आली.अनेकांना निराश व्हावे लागले त्याबद्दल डॉ.दिगंबर घोडके यांनी खेद व्यक्त केला.
शिबीर यशस्वी करण्यासाठी डॉ.दिगंबर घोडके, सहाय्य्क ऑपरेटर पंकज जोशी, सोमेश पाटील,   संदीप गजमल, शिवाजी डासाळकर, श्रीकांत झुटे आदिनी परिश्रम घेतले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page