Monday, April 20, 2026
Homeबल्लारपूरबल्लारपुरात महिला दिनाचा कार्यक्रम संपन्न
spot_img

बल्लारपुरात महिला दिनाचा कार्यक्रम संपन्न

बल्लारपुरात महिला दिनाचा कार्यक्रम संपन्न

श्रेयश वानखेडे:

सामाजिक एक वेळ व महिला आरोग्य जपणे गरजेचे महिला सामाजिक आर्थिक, राजकीय व शैक्षणिक उंची गाठायची असेल तर आपले आरोग्य जपले पाहिजे तसेच सामाजिक एकी असणे गरजेचे आहे. असे महिला आघाडी च्या अध्यक्ष वंदनाताई शामराव पोटे, उपाध्यक्ष किरण ताई संजय बोबडे, सचिव सोनाली काकडे, यांनी म्हटले, श्री संत तुकाराम सेवा मंडळ, बल्लारपूर बामणी द्वारा महिला दिनाचा कार्यक्रम दिनांक 9/3/2025 रोज रविवार संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संत तुकाराम सेवा मंडळ बल्लारपूर बामणी च्या सहसचिव कमलताई वडस्कर, तसेच मान. अर्चनाताई देवराव भाऊ भोंगळे, तसेच संत तुकाराम सेवा मंडळ बल्लारपूर बामणीच्या आजीवन सदस्य, मान. कुंदाताई पावडे, हे प्रामुख्याने उपस्थित होत्या, यावेळी मान. अर्चनाताई देवराव भाऊ भोंगळे यांनी म्हटले की, स्त्री माता आहे स्त्री बहीण आहे  पत्नी आहे भगिनी आहे कुटुंबाचा आधार आहे हा आधार सर्वांनी मिळून जपणे गरजेचे आहे.
युवा वर्गाने तिचे चांगले विचार आचरणात आणणे गरजेचे आहे. युवा आघाडी सर्व महिला गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी विविध कार्यक्रम संपन्न झाले. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी, सौ. शोभाताई माडेकर , सौ. अर्चनाताई फरकाडे, सुवर्णाताई कष्टी, कुमारी आचल काकडे यांचा सहयोग लाभला.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page