प्रज्ञासूर्य बाबासाहेबास १८ तास अभ्यास करून अभिवादन
श्रेयश वानखेडे:
महामानव प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भिक्षु निवास पाली विद्यालय बुद्ध विहार समितितर्फे “१८ तास सतत अभ्यास” हा उपक्रम आयोजित केला आहे. बाबासाहेब विदेशात उच्च शिक्षणासाठी गेले असतांना १८-१८ तास अभ्यास करायचे. तोच आदर्श समोर ठेवून बाबासाहेबांना अभिवादन करण्याकरिता भिक्षु निवास पाली विद्यालय बुद्ध विहार, विद्यानगर बल्लारपुर येथे हा उपक्रम राबविन्यात येत आहे. या उपक्रमाची शुरुवात स. ६.०० वाजता होईल व रात्रि १२.०० वाजता सांगता होईल. तरी जास्तित जास्त संख्याने उपस्थित रहावे असे आव्हान तुलसीदास खैरे, संपत कोरड़े, जयदास भगत यांनी केले आहे.