Tuesday, September 15, 2026
spot_img
HomeEducationमोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बल्लारपूर येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस...

मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बल्लारपूर येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बल्लारपूर येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

ज्योत्स्ना वानखेडे:

मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बल्लारपूर येथे दिनांक २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. हा दिवस महान शास्त्रज्ञ सी. व्ही. रमण यांनी लावलेल्या “रमण परिणाम” या महत्त्वपूर्ण शोधाच्या स्मरणार्थ साजरा केला.या कार्यक्रमासाठी शाळेच्या प्राचार्या असमा खान मॅडम व पर्यवेक्षिका सुनिता कांबळे मॅडम यांनी डॉ. सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमेला दीप प्रज्वलन व माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. सुरुवातीला वर्ग नववीच्या विद्यार्थिनींनी विज्ञान गीत गायन केले तसेच आठवीच्या विद्यार्थिनींनी ह्यूमन सेल विषयी ऍक्टिव्हिटी सादर केली. तसेच संजय ठोंबरे सर यांनी विज्ञान व अंधश्रद्धा या विषयावर विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टीकोणातून चिकित्सा करता यावी याकरिता मार्गदर्शन केले. वर्ग अकरावीच्या विद्यार्थिनींनी विज्ञानावरील आधारित रासायनिक अभिक्रिया यासारखे अनेक सोपे व उपयुक्त प्रयोग दाखविले. तुषार चौधरी सर यांनी विज्ञान विषयक प्रश्नावर प्रश्नमंजुषा घेतली त्यामध्ये वर्ग आठवीची विद्यार्थिनी मुस्कान शेख विजेती झाली. सीमा धाडवे मॅडम यांनी नैसर्गिक रंग व सेंद्रिय रंग विषयक विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. अध्यक्षीय भाषणामध्ये शाळेच्या प्राचार्या असमा खान मॅडम यांनी विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील विज्ञान तसेच अंधश्रद्धा याविषयी माहिती सांगून मार्गदर्शन केले. अशाप्रकारे राष्ट्रीय विज्ञान दिनाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्वक पार पडला. कार्यक्रमाचे संचालन सीमा धाडवे मॅडम तसेच आभार प्रदर्शन शबाना मॅडम यांनी केले या कार्यक्रमाकरिता विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page