Tuesday, August 25, 2026
spot_img
HomeEducationमॉन्टफोर्ट शाळेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह संमेलन कार्यक्रम

मॉन्टफोर्ट शाळेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह संमेलन कार्यक्रम

मॉन्टफोर्ट शाळेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह संमेलन कार्यक्रम 

श्रेयश वानखेडे: 
दिवाळीच्या शुभमुहूर्तावर ३० ऑक्टोबर  माँटफोर्ट शाळेच्या प्रांगणात माजी विद्यार्थ्यांचा (रि-युनियन) स्नेह संमेलन कार्यक्रम पार पडला.
       कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्वागत गीत व स्वागत नृत्याने झाली.  ज्यामध्ये १९९५ ते २०२३ पर्यंत ३३८ माजी विद्यार्थी सहभागी झाले होते.  हे विद्यार्थी देश-विदेशात विविध ठिकाणी उच्चस्तरीय सेवेत कार्यरत आहेत.  डॉक्टर, अभियंता, शास्त्रज्ञ, शिक्षण विभाग, वाणिज्य, व्यवसाय, हवाई दलाचे वैमानिक, नौदल, सैन्य, रेल्वे अशा अनेक क्षेत्रात ते महत्त्वाचे योगदान देत आहेत आणि कार्यरत आहेत.  मॉन्टफोर्ट शाळा नेहमीच आपल्या विद्यार्थ्यांना समाजात विविध क्षेत्रात उच्च स्थान मिळवावे यासाठी प्रयत्नशील असते. यासाठी त्यांना विविध प्रकारच्या स्पर्धांद्वारे तयार केले जाते आणि उच्चस्तरीय शिक्षण दिले जाते. कार्यक्रमा दरम्यान प्राचार्य ब्रदर प्रेम कुमार आणि माजी प्राचार्य, माजी शिक्षक, माजी विद्यार्थ्यांनी आपले विचार व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात केलेली कामगिरी पाहून त्यांना अभिमान व आनंद वाटत होता.  सर्व माजी विद्यार्थी इतक्या वर्षांनी एकमेकांना भेटल्याचा आनंद व्यक्त करत आपले विचार मांडत होते.   हा कार्यक्रम प्रामुख्याने शाळेचे प्राचार्य ब्रदर प्रेम कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता, यावेळी ब्रदर किशोर कुमार, ब्रदर बाला शौरी, ब्रदर   लुरदु रेड्डी, ब्रदर मॅन्सन कुरियाकोस,  ब्रदर एम.ए. अँटोनी, ब्रदर देवसिया व शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी यांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता मोठ्या उत्साहात झाली.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page