महावितरणच्या मुजोरी धोरणामुळे म्हातारदेवी नागरीकांना राहावे लागते पाण्याविना

श्रेयश वानखेडे: चंद्रपूर तालुक्यातील म्हातारदेवी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वर्धा नदीच्या पात्रातून पाणी पुरवठा होत असतो. गेल्या काही दिवसांपासून तक्रार दिल्यानंतर दोन दिवस विज सुरू होत नाही. अनेक कारणे सांगितली जातात ठेकेदार नाहीत माणसे नाही, अनेक कारणे सांगून विज दोन दोन दिवस बंद ठेवली जाते आहे.
तेव्हा महावितरणच्या 24 तासांच्या आत लाईन सुरू केली पाहिजे. नागरीकांना झालेल्या त्रास म्हणून नुकसान भरपाई दयावे लागेल हा नियम देखावा करण्यासाठी आहे का असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडतो आहे. महावितरणच्या कर्मचारी यांनी नागरिकांचा अंत पाहू नये. जनता रस्त्यावर उतरली तर तुमची जागा दाखविण्यासाठी वेळ लागणार नाही. मुजोऱ्या थांबवा महावितरणच्या वरीष्ठ अधिकारी यांनी नागरिकांचा समस्या घेऊन कार्यवाही करावी अशी मागणी म्हातारीदेवी येथील नागरिक कडून होते आहे.