Monday, September 14, 2026
spot_img
Homeबल्लारपूरबल्लारपुर येथे रविवारीय बाल धम्म संस्कार वर्ग संपन्न

बल्लारपुर येथे रविवारीय बाल धम्म संस्कार वर्ग संपन्न

बल्लारपुर येथे रविवारीय बाल धम्म संस्कार वर्ग संपन्न

बाल मनावर धम्म शिकवनुकीतुन योग्य संस्कार केले तर आदर्श व्यक्ती घडतो- धम्मचारी आर्य छंद

श्रेयश वानखेडे 
नियमित होनारा रविवारीय बाल धम्मवर्ग दिनांक: 28/07/2024 रोजी  संपन्न झाला. बल्लारपूर येथे मागील चार वर्षांपासून नियमित सुरू असलेल्या या बाल धम्मवर्गातुन बाल मनावर धम्म रुजवुन आदर्श व्यक्ती घडवीन्याचे महत्कार्य सुरू आहे ही अतिशय अभिमानास्पद आणि कौतुकास्पद बाब असे उदगार धम्मचारी आर्यछंद (नागपुर) ह्यांनी या प्रसंगी काढले. धम्मचारी संघशील,धम्मचारी रत्ननायक हे सुद्धा उपस्थीत होते. सुरुवातीला श्रेया रामटेके हिने पाली भाषेतून त्रिशरण पंचशील दिले. मराठीतून पंचशील देवप्रिया रामटेके हिने घेतले. विधायक पंचशील  तृषा वासेकर हिने घेतले. शास्वत देवगडे, गार्गी दारुंडे, क्षितिजा चौधरी, जीविका दारुंडे, चरिता भुजाडे,श्रेया रामटेके यांनी बुद्धपूजाचे नेतृत्व केले. आराध्या चौधरी हिने आणापान सती ध्यानाचे नेतृत्व केले. धम्मचारी संघशील यांनीही मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे  संचालन धम्ममित्र संपत कोरडे, तर सर्वांचे आभार धम्ममित्र भास्कर भगत यांनी मानले. धम्मपालन गाथेचे नेतृत्व चरिता भुजाडे हिने केले.धम्मपालन गाथेने वर्गाची सांगता करण्यात आली. वर्गाला मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page