आमदार भाई जगताप मुंबई यांची शिक्षण विभागातील भ्रष्टाचारावर एसआयटी ची मागणी
श्रेयश वानखेडे:
खाजगी शाळेतील नियमबाह्य मान्यता व शालार्थ आयडी याबाबत एस आय टी गठीत करणे तसेच खाजगी शाळा शिक्षक संघाच्या दिनांक १६ डिसेंबर २०२४ त्यांचे करण्यासाठी आयुक्त शिक्षण यांना निर्देश देण्याची मागणी केली आहे खाजगी शाळा शिक्षक संघाचे आंदोलन व निवेदन दिनांक १६ डिसेंबर २०२४, भाई जगताप यांचे पत्र दिनांक ३१ डिसेंबर २०२४ तसेच सर्व वृत्तपत्र, प्रसार माध्यमांनी भ्रष्टाचाराबाबत उल्लेख केला आहे नियमबाह्य मान्यता व शालार्थ आयडी मोठा स्कॅन्डल असुन राज्य सरकारची बदनामी होत आहे, बाबत एस. आय. टी. गठीत करण्यात येवून त्यामाध्यमातून भ्रष्टाचारी व्यक्तीला शिक्षा होण्यासाठी मा मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना विधिमंडळ सदस्यांच्या भावना अवगत करण्यात याव्यात असे रणजीतसिंह देओल,(I.A.S.) प्रधान सचिव,शालेय शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई – ३२ निवेदनातून स्पष्ट केले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील प्रकरणाबाबत निवेदन दिनांक १३ फेब्रुवारी २०२५ व दिनांक १० मार्च २०२५ कार्यवाही करण्यात आलेली नाही. भ्रष्टाचार निर्मूलन तक्रार चंद्रपूर दिनांक २७ जुलै २०२४ तसेच जानेवारी २०२५ मधे प्रत्यक्षात अडकुनही आयुक्त [शिक्षण] यांचे वाढत्या भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष होत आहे. वेतन पथक माध्यमिक चंद्रपूर यांनी शिक्षकेतर कर्मचारी यांचे नियमबाह्य मान्यता व अदा केलेल्या वेतनाबाबत संबंधित दोषी अधिकारी यांचे विरुद्ध आयुक्त शिक्षण यांनी कारवाई करावी.
शिक्षण विभाग व आरोग्य विभागाच्या निर्देशातून कोरोना-२०१९ सर्वक्षण कामात मृत्यु पावलेल्या कोरोना योद्धा सानुग्रह अनुदान ₹५० लक्ष रक्कम मिळालेली नाही. नागपुर विभागातील बालाजी हायस्कूल हिंगणा, माध्यमिक विभाग नागपूर मयत रामदास काकडे तसेच माध्यमिक विभाग जिल्हा गडचिरोली मयत दीपक सोमनकर, बोमनवार हायस्कूल चामोर्शी जिल्हा गडचिरोली यांच्या वारसांना सानुग्रह अनुदान मिळणे याचा उल्लेख आपल्या निवेदनात केला असुन त्याच्या प्रती आयुक्त (शिक्षण)महाराष्ट्र राज्य शिक्षण,मा. शिक्षण संचालक [ माध्यमिक व उच्च माध्यमिक] तसेच मा.शिक्षण संचालक [प्राथ.] प्राथमिक शिक्षण संचालनालय, यांना दिलेल्या आहेत.