श्रीराम प्रतिष्ठान संचलित प्रॉस्परस पब्लिक स्कूलचा एसएससी बोर्ड परीक्षेत शंभर टक्के निकाल.
श्रेयश वानखेडे:
श्रीराम प्रतिष्ठान संचलित प्रॉस्परस पब्लिक स्कूलचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा (इ. 10 वी )फेब्रुवारी -मार्च 2025 च्या परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. यामध्ये कु अक्षरा गणेश चव्हाण 94.40% गुण घेऊन हिचा शाळेमधून प्रथम क्रमांक आला आहे. आयुष राजकुमार पवार 91.20% गुण घेऊन द्वितीय क्रमांक आलेला आहे. तसेच अभिषेक भागवत बागल 83.20% व आदित्य योगेश टेंभरे 83.20% यांचा शाळेमधून तृतीय क्रमांक आलेला आहे. वैष्णवी सतीश मगर 82.20%, अदिती अमर बोराडे 80.40%, संचिता सर्जेराव लहाने 80.20%, संस्कृती सुशील टोगरे 80.20%, प्रणव संतोष भरदम 61.40%, योगेश संजय सुरवसे 61%, अभिषेक अंकुश जाधव 58.40% गुणसह उत्तीर्ण झालेले आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ संजय रोडगे, शाळेच्या प्राचार्य प्रगती क्षीरसागर व शिक्षक वंद यांनी कौतुक केले . व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.