Sunday, June 28, 2026
HomeMaharashtraसंच मान्यतेबाबतचा अन्यायकारक निर्णय रद्द करण्याबाबत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे धरणे
spot_img

संच मान्यतेबाबतचा अन्यायकारक निर्णय रद्द करण्याबाबत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे धरणे

संच मान्यतेबाबतचा अन्यायकारक निर्णय रद्द करण्याबाबत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे धरणे

श्रेयश वानखेडे:

दि. १५ मार्च २०२४ रोजीचा संचमान्यतेबाबतचा अन्यायकारक शासन निर्णय रद्द करण्याबाबत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने दिनांक  १४ मे २०२५ रोजी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या कार्यालयासमोर एक दिवसीय विदर्भस्तरीय धरणे / निदर्शने आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आमदार श्री. सुधाकर अडबाले यांनी  मंत्रालयात शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकजजी भोयर, प्रधान सचिव श्री. रणजीत देओल, उपसचिव श्री. तुषार महाजन यांची भेट घेऊन विषयाची गंभीरता लक्षात आणून दिली.

दि. २८ ऑगस्ट २०१५ च्या शासन निर्णयानुसार यापूर्वीचे संच निर्धारण होत होते. त्याप्रमाणेच शैक्षणिक सत्र २०२४-२५ चे संच निर्धारण करण्यात यावे व दि. १५ मार्च २०२४ रोजीचा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा अन्यायकारक शासन निर्णय रद्द करावा, या प्रमुख मागणीसाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने झालेल्या धरणे/ निदर्शने आंदोलनाचे निवेदन आमदार श्री. सुधाकर अडबाले यांनी शिक्षण राज्यमंत्री, सचिवांना दिले.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page