Monday, October 12, 2026
spot_img
HomePoliticalकाँग्रेस खासदार डॉ. अंगोमचा बिमोल ओकझम यांचा जाहीरनिषेध; JNU प्रकरणी भाजप महिला...

काँग्रेस खासदार डॉ. अंगोमचा बिमोल ओकझम यांचा जाहीरनिषेध; JNU प्रकरणी भाजप महिला मोर्चाचे चंद्रपुरात आंदोलन

काँग्रेस खासदार डॉ. अंगोमचा बिमोल ओकझम यांचा जाहीरनिषेध; JNU प्रकरणी भाजप महिला मोर्चाचे चंद्रपुरात आंदोलन

गांधी चौकात निदर्शने; विद्यार्थिनींच्या लैंगिक छळाच्या प्रकरणाचा निषेध करत कठोर कारवाईची मागणी

*Jyotsna Wankhede*: दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (JNU) ११ विद्यार्थिनींच्या कथित लैंगिक छळाच्या प्रकरणाच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, चंद्रपूर महानगरच्या वतीने गांधी चौक येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान काँग्रेस खासदार डॉ. अंगोमचा बिमोल ओकझम यांचा जाहीर निषेध करण्यात आला. महिलांच्या सन्मानाशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही, अशी ठाम भूमिका महिला मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मांडली.

यावेळी महामंत्री सविता दंढारे, महिला मोर्चा प्रभारी वंदना हातगावकर, अध्यक्षा अनु. जाती मोर्चा विमल काटकर, अध्यक्षा अल्पसंखाक आघाडी कौसर खान, ओबीसी नेते शालू कन्नोजवार, सपना सातपुते, रेश्मा पांडे, भावना बरसागडे, रेणुका येरणे, भाग्यश्री येरणे, सोनाली इटनकर, गीता डंभारे, वंदना हजारे, मनीषा पडगेलवार, वंदना कडूकर, अनुषातोरे, अर्चना डांगरे, आशा ढेंगळे, चंदा इटनकर, सविता ब्राम्हणे आदी प्रमुखाने उपस्तीथ होते.

विद्यापीठासारख्या शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थिनींची सुरक्षितता आणि सन्मान सर्वोच्च असला पाहिजे. महिलांशी संबंधित अशा गंभीर प्रकरणांची निष्पक्ष चौकशी होऊन सत्य समोर यावे आणि संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. विद्यार्थिनींना न्याय मिळावा आणि भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी संबंधित यंत्रणांनी ठोस पावले उचलावीत, असेही यावेळी सांगण्यात आले.

या प्रकरणात काँग्रेस खासदार डॉ. अंगोमचा बिमोल ओकझम यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी महिला मोर्चाच्या वतीने करण्यात आली. त्यांच्या भूमिकेचा निषेध करत आंदोलनकर्त्यांनी जाहीर निषेधाच्या घोषणा दिल्या. उपलब्ध वृत्तांनुसार, संबंधित प्राध्यापकाला JNU प्रशासनाने सेवेतून बडतर्फ केले असून, दिल्ली पोलिसांनीही या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा पुढील तपास निष्पक्षपणे करून कायद्यानुसार योग्य कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

महिलांचा सन्मान, सुरक्षितता आणि न्याय या मुद्द्यांवर कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही, असा संदेश या आंदोलनातून देण्यात आला. महिलांवरील कथित अत्याचारांच्या प्रकरणांत राजकीय किंवा अन्य कोणताही दबाव न ठेवता निष्पक्ष चौकशी व्हावी आणि पीडितांना न्याय मिळावा, अशी भूमिका भाजपा महिला मोर्चाच्या वतीने मांडण्यात आली.

यावेळी भाजप महिला कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्तीथी होत्या.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page