Monday, September 14, 2026
spot_img
HomeChandrapurम्हातारदेवी ग्रामपंचायतीच्या घरकुल घोटाळ्याची चौकशी थंडबस्त्यात.

म्हातारदेवी ग्रामपंचायतीच्या घरकुल घोटाळ्याची चौकशी थंडबस्त्यात.

म्हातारदेवी ग्रामपंचायतीच्या घरकुल घोटाळ्याची चौकशी थंडबस्त्यात.

श्रेयश वानखेडे:

चंद्रपूर तालुक्यातील म्हातारदेवी ग्रामपंचायतीच्या रमाई घरकुल योजनेतील घरे देण्यात महाघोटाळा केला आहे. सरस्वती विद्यामंदिर येथे कार्यरत असलेले श्री चंदन बंड प्रयोगशाळा परिचर या पदावर कार्यरत आहेत. तसेच प्रकाश बोरकर शिपाई पदावर कार्यरत आहेत. तेव्हा दोन्ही कर्मचारी यांनी आपले पत्नी च्या नावाने घरकुल घेतले आहे. परंतु ज्या लाभार्थी योजनेत बसत होते त्यांना घरकुला पासून वंचित ठेवले आहे. तेव्हा घरकुल देत असतांना तो नियमांत बसतो की नाही याची पडताळणी करून आपण घरकुल देत असतो. सरपंच व ग्रामसेवक पंचायत समिती अधिकारी झोपत असतात काय प्रश्न सामान्य नागरिकांना पडतो आहे. शासनानी घरकुल योजना सुरू केली आहे. परंतु अंमलबजावणी संबंधित विभागाने करणे आवश्यक आहे. परंतु सरपंच व ग्रामसेवक हे विशिष्ट राजकीय पुढारी व अधिकारी यांच्या सहकार्याने हे सर्व नियम धाब्यावर बसवून मंजुरी प्रदान करत असतात. तेव्हा घरकुल मंजूर करत असतांना नियम ठेवू नये. सरपंच व ग्रामसेवक पंचायत समिती अधिकारी यांना कोणालाही घरकुल देण्याचा अधिकार आहे असे शासनाने नियमावली तयार करावी. अन्यथा भ्रष्टाचारी सरपंच सौ. संध्या पाटील व सतीश मुनगंटीवार ग्रामसेवक पंचायत समिती अधिकारी तेलंग यांचेवर फौजदारी कार्यवाही करावी. अशी मागणी बंडू बरडे यांनी संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती चंद्रपूर यांचेकडे केली आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page